👁 8 Views

नाहितर …. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विरोधी आंदोलन – समीर कोळी

पंढरपूर LIVE 26 Jun 2018

  
 पंढरीचे दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनास येणारया भाविकांच्या सोईसाठी मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या यात्री भवनात काही दुकान गाळे काढण्यात आले आहेत. सदर गाळे पंढरपूरातील नागरिकांना अग्रक्रमाने देण्यात यावेत कारण पंढरपूरातील नागरिकांचे जीवन विठ्ठलाच्या यात्रेवर अवलंबून असून पंढरपूरातील नागरिकांनी विठ्ठलाच्या भाविकांच्या सोईसाठी आपली घरेदारेही गमावलेली आहेत. अशा विठ्ठलाच्या भाविकांसाठी त्याग करणाऱ्या  पंढरीच्या नागरिकांना एम.आय.डी.सी. चा आधार ना उद्योगधंद्यासाठी भांडवल तेंव्हा आपल्या उदरनिर्वाहासाठी छोटी छोटी दूकानदारी करून जगणारया पंढरपूरातील स्थानिकांना सदर यात्री भवनातील दुकान गाळे देण्यात यावेत. याउलट बाहेरील धनदांडग्यांना गाळे दिल्यास पंढरीतील नागरिकांनी मंदीर समितीस का सहकार्य करावे असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहाणार नाही. तेंव्हा पंढरपूरातील स्थानिकांना अग्रक्रमाने गाळे दिले जाणार नसल्यास पंढरपूरातील जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल व तीव्र आंदोलन  छेडावे लागले याची नोंद घ्यावी .   या आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, ओबीसी विभागाकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ला देण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी,  जिल्हाउपाध्यक्ष चंद्रसेन मल्लाव, काँग्रेस कमिटी चिटणीस अमर सुर्यवंशी, प्रा.अशोक डोळ, मामा फलटणकर, प्रा. मारूती भोसले, बाळासाहेब आसबे ,शिवाजी धोत्रे ,  आषपाक सय्यद ,अमित अवघडे, अभिषेक शहा , गणेश माने, मधुकर फलटणकर इत्यादी मान्यवर व बहुसंख्य कार्यकर्ते , काँग्रेस प्रेमी उपस्थित होते


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *