👁 17 Views

अफवेतून बळी पडलेल्यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांनी अर्थसहाय्य द्यावे… पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीची मागणी

पंढरपूर LIVE 2 July 2018

पंढरपूर (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा आठवडी बाजारात मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेने मंगळवेढा तालुक्यातील चार व इंडी तालुक्यातील एका व्यक्तीचा जमावाने भीषण मारहाण करून त्यांची हत्त्या केली. या हत्त्येमध्ये बळी पडलेले पाचही व्यक्ती या अत्यंत गरीब कुटूंबातील व पोटासाठी गावोगावी भटकणार्‍या व्यक्ती होत्या. पोटाची खळगी भरण्यासाठी ते काही ठिकाणी भिक्षा मागून तर काही ठिकाणी ज्योतिष सांगून मिळणार्‍या अन्नावर व चार पैशांवर आपली उपजीविका करत होत्या. त्यांच्या हत्त्येने त्यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यातूनही ही गरीब कुटूंबे सावरणे शक्य नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधीतून या पाचही कुटूंबियांना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या लेखी पत्रात केली आहे. 
या पत्रात वाईकर यांनी असे म्हटले आहे की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील या पाचजणांची धुळे जिल्ह्यात निर्घृणपणे हत्त्या करण्यात आली. या हत्त्येने सारा सोलापूर जिल्हा हादरला आहे. उपजीविकेसाठी गावोगावी भटकणार्‍या दादाराव शंकर भोसले (वय 47), भारत शंकर भोसले (वय 45), भारत शंकर माळवे (वय 45) सर्व रा. खवे, ता. मंगळवेढा व अग्नु उर्फ आप्पा श्रीमंत इंगोले (वय 22, रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा) आणि राजू रामा भोसले (वय 45, रा. गुंडवान, ता. इंडी, जि. विजापूर) या पाचजणांचे कुटूंब उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या कुटूंबियांना त्वरीत अर्थसहाय्य देऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. 
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेतून त्यांच्या कुटूंबियांना मदत करून त्या कुटूंबाचे पुनर्वसन करावे. तसेच त्या कुटूंबातील एकाला शासकीय सेवेमध्ये समाविष्ठ करून घ्यावे, अशीही मागणी वाईकर यांनी केली आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *