पंढरपूर LIVE 2 July 2018
पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी आमदार परिचारक गटाचे गुरसाळे पं. स. गणाचे सदस्य राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते सभापती दिनकर नाईकनवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावर पाटील यांची निवड झाली आहे. तत्पूर्वी सकाळी परिचारक गटाच्या सर्व सदस्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक झाली होती. या वेळी राजेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. त्यानंतर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १ वाजल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी राजेंद्र पाटील यांची सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले आणि पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सहायक निवडणूक निर्णयाधिकारी एस. जे. पवार उपस्थित होते. निवडीनंतर जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते नूतन सभापती पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी उपसभापती अरुण घोलप, माजी सभापती दिनकर नाईकनवरे, सदस्य संभाजी शिंदे, सत्यवान देवकुळे, प्रशांत देशमुख दादासाहेब मोटे, राजश्री भोसले, पल्लवी यलमार, उमादेवी चव्हाण, अर्चना पाटोळे, राहुल पुरवत, बाजार समिती सभापती दिलीप घाडगे, माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे, तानाजी वाघमोडे, माजी जि. प. सदस्य बाळासो देशमुख आदी उपस्थित होते. नूतन सभापती पाटील यांचा आमदार प्रशांत परिचारक यांनी सत्कार केला
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com










