पंढरपूर LIVE 2 July 2018
कृषी पंढरी कृषी महोत्सवाच्या मंडप उभारणीला सुरुवात…
सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.
पंढरपूर – आषाढी वारीच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या ३ वर्षापासून राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी हा कृषी महोत्सव दि.२१ ते २५ जुलै दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर होत असून यावेळी कृषी प्रदर्शनाबरोबरच कृषी औजारांच्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष क्षेत्र, देशी गायींचे प्रदर्शन, लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांचे विशेष दालन व महिला बचत गटांचे विशेष दालन यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनामध्ये ३०० पेक्षा जास्त स्टॉल्स चा समावेश असून एकूण ७ एकर विस्तीर्ण क्षेत्रावर हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या प्रदर्शनाचा मंडप उभारणी शुभारंभ जेष्ठ नेते सुधाकरपंत यांच्या हस्ते आज बाजार समिती मैदानावर पार पडला.
यावर्षी हे प्रदर्शन आणखी लोकाभिमुख व येणाऱ्या भाविकांच्या क्षेत्रातील पिकांच्या पद्धती बरोबरच सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब व द्राक्षे हि पीके देखील केंद्रस्थानी ठेवावीत तसेच पारंपारिक शेती पद्धती बरोबरच सेंद्रिय शेती व मधमाशी पालन, आगरवूड लागवड, शेळीपालन, बांबू लागवड, मोत्यांची शेती, देशी बियाणे या विषयावरील स्टोल्सचा देखील समावेश करण्याची सूचना श्री परिचारक यांनी कार्यकर्त्यांना केल्या. यावेळी उपस्थितांचे स्वागत सभापती श्री दिलीप घाडगे यांनी केले. प्रदर्शनादरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी घाडगे यांनी दिली. यामध्ये दि.२१ जुलै रोजी औपचारिक शुभारंभ, दि. २२ जुलै रोजी मुख्य उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा, दि. २३ जुलै रोजी एक दिवसीय कृषी पारायण सोहळा, दि. २५ जुलै रोजी समारोप समारंभ असा कार्यक्रम आयोजित केला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने यावर्षी संवाद वारी या उपक्रमांतर्गत विशेष शासकीय दालन देखील उभारले जाणार आहे. या दालनामध्ये शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती वारकरी व शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती श्री घाडगे यांनी दिली. या महोत्सवाचे व्यवस्थापन शुअर शॉट इव्हेंट्स हि कंपनी करत असून सर्व मंडप वारा, वादळ यापासून सुरक्षित पद्धतीने सुपर स्ट्रक्चर पद्धतीने उभारण्यात येत असून सर्व स्टॉल्स प्रीफॅब्रीकेटेड स्वरूपाचे असणार आहेत. भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीचा विचार करून जास्तीत जास्त मोकळी जागा ठेवण्यात आली असून पशु पक्षी प्रदर्शनामध्ये देखील देशी गायीच्या दालनामध्ये देखील मंडप उभारताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती शुअर शॉट इव्हेंट्स चे संचालक श्री संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली.
यावेळी दिलीपराव चव्हाण, हरीशदादा गायकवाड, बाळासाहेब देशमुख, तानाजीराव वाघमोडे, लक्ष्मणराव धनवडे, सुरेशराव आगवणे, भगवानराव चौगुले, पंडितराव भोसले, भास्कर शिंदें, पोपटराव देठे, नीलकंठ इनामदार, महादेव घाडगे, संतोष घोडके, शिवाजी गवळी, आनंदराव आरकिले, अरुण घोलप, दादासो मोटे, बाळासाहेब यलमार, प्रशांतराव देशमुख, चंदाताई तिवारी, कमलाताई तोंडें यांच्या सह मोठ्या संख्येने पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते उपस्थित होते. बाजार समितीचे उपसभापती श्री विवेक कचरे यांनी आभार मानले व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देण्याचे आवाहन केले.
या कृषी महोत्सवामध्ये स्टॉल्स बुकिंगसाठी संपर्क – ९६६५४७४८१४, ९९७००७०४७०

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com