👁 11 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्या ७ सफाई कर्मचा-यांना नगराध्यक्षाच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप

पंढरपूर LIVE 3 July 2018

पंढरपूर नगरपरिषदेकडे गेल्या अनेक वर्षांत सफाईचे काम करित असलेले कर्मचारी सेवा निवृत्त झाले होते. अशा सफाई कर्मचा-यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती द्यावी म्हणुन पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट व नगराध्यक्ष सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार आज नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, आरोग्य समिती सभापती अनुसया शिरसट, पक्षनेते अनिल अभंगराव, नगरसेवक सुजित उर्फ राजु सर्वगोड, विक्रम शिरसट, दत्तात्रय कवठेकर, संजय निंबाळकर, नरसिंह शिंगण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्णा जाधव, मनिषा रणदिवे, मुकेश गोयल, महेश वाघेला, सचिन साठे, सुहास सर्वगोड, रवि मेहडा या ७ सफाई कर्मचा-यांना वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यावेळी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह.कार्याध्यक्ष शरद वाघमारे, उपाध्यक्ष किशोर खिलारे, अनिल गोयल, संतोष सर्वगोड, जयंत पवार, खजिनदार सुनिल बोडके, कामगार नेते गुरु दोडिया, सुखदेव माने, नागनाथ तोडकर, श्रीशैल्य चाबुकस्वार, दर्शन वेळापुरे, धनजी वाघमारे, अनिल अभंगराव, पोपट जाधव व इतर कर्मचारी व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.    

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *