👁 10 Views

परळीतील दोन वारकरी महिलांचा अपघातामध्ये मृत्यू

पंढरपूर LIVE 4 July 2018

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मोशी येथे मुक्कामी असलेल्या दिंडीतील दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. रस्ता ओलांडत असताना या महिलांना वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जनाबाई साबळे (५५) आणि सुमनबाई इंगोले (६०) अशी या मृतांची असून त्या परळी तालुक्यातील रहिवासी होत्या. आळंदीच्या दिंडीत सहभागी झालेल्या जनाबाई साबळे आणि सुमनबाई इंगोले या पंढरपूरला जाणार होत्या. ही मंगळवारी दिंडी मोशी येथे मुक्कामी होती. बुधवारी पहाटे त्या दोघी प्रात:विधीला जात होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *