पंढरपूर LIVE 4 July 2018
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या जयंती निमित्त पिराची कुरोली येथे शेतकर्यांनी एकमेकांना साखर भरवून मोठ्या उत्साहात कृषिदिन साजरा केला .
रत्नाई कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून 1 जुलै रोजी पिराची कुरोली येथे कृषिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषिदूत तेजस मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
सदर बातमी व्हिडीओ स्वरुपात पहाण्यासाठी खाली क्लिक करा…
यावेळी कृषिदूत सुदर्शन सुतार याने आपल्या प्रास्ताविकात कृषिदिन हा केवळ वृक्षलागवड करून पूर्ण होऊ शकत नाही तर त्याजोडीने खरोखरच जो वृक्षाची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतो त्याला खतपाणी घालतो रोगराई पासून वाचवतो त्या शेताकार्यास देखील यात सामील करून घेतले पाहिजे,जगाचा पोशिंदा असणार्या शेतकर्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजेक,वर्षतला एक दिवस त्याच्यासाठी सणा प्रमाणे साजरा केला पाहिजे.असा विचार मांडला व कृषिदिनाची जनजागृती वाढवण्यासाठी साखर वाटून वेगळया पद्धतीने कृषिदिन साजरा करण्याची संकल्पना मांडली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.भाळवणी चे चेअरमन कल्याणराव काळे हे उपस्थित होते व प्रमुख वक्ते दिनेश कौलगे हे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कल्याणराव काळे यांनी शेतकर्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे आवाहन केले , तसेच महागड्या रासायनिक खतांऐवजी शेतात उपलब्ध होणार्या शेणखत, कंपोस्ट यांचा पुरेपूर उपयोग करावा . त्याचबरोबर शेतकर्यांनी वेळोवेळी मातीपरिक्षण करून घेणे ,पाण्याचे योग्य नियोजन करणे, उन्हाळ्यात पिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शेततळ्यांची योजना घेणे. तसेच तज्ज्ञांकडून नवनवीन माहीती घेणे यासंबंधी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांनी ऊस पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी मातीपरिक्षण, पाण्याचे व्यवस्थापन, पीक संरक्षण, ऊस लागवड पद्धती, सेंद्रिय व रासायनिक खतांचे व्यवस्थापन ही पंचसुत्रे सांगितली.
अध्यक्षीय भाषणानंतर अध्यक्ष व शेतकर्यांनी एकमेकास साखर वाटून कृषिदिन साजरा केला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावंतवस्ती, पिराची कुरोली येथे मान्यवरांच्या हस्ते शास्त्रीय पध्दतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
या समारंभास बाळासाहेब कौलगे, अशोक सावंत, सरपंच कुलदीप कौलगे, पंढरीनाथ लामकाने, परमेश्वर लामकाने, रामचंद्र कौलगे, मच्छीन्द्र सावंत, उद्धव कौलगे, तुकाराम माने आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, रत्नाई कृषि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलावडे , कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. एम. एकतपुरे व प्रा.एस. आर. आडत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिदूत ओंकार गायकवाड, सुदर्शन सुतार, राकेश शिंदे , सागर पवार, सुरज गुंड, तेजस मोहिते, साहिल कोठारी, महेश सुर्यवंशी,सृजन पुट्टा आदिंनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com