👁 7 Views

अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांचेवरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्ह संभाजी ब्रिगेडचे निवेदन

पंढरपूर LIVE 4 July 2018

अहमदनगर येथील शिवभक्त अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या समाजकंटकावर कडक करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलीय. यासह इतर कांही मागण्यांबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंढरपूर चे तहसिलदार मुसुदन बर्गे यांना देण्यात आले.

सदर बातमी व्हिडीओ स्वरुपात पहाण्यासाठी खाली क्लिक करा…


अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिौाजी महाराज यांच्यावर कांही महिन्यापूर्वी अत्यंत अश्‍लिल व निषेधार्ह वक्तव्य केले होते. अहमदनगर येथील शिौभक्त अ‍ॅड. गजेंद्र दांगट हे मोर्चा काढून छिंदम यांचा निषेध करण्यामध्ये आघाडीवर होते. याचा राग मनात धरुन दि. 30 जुन 2018 रोजी अ‍ॅड. दांगट यांच्यावर पाळत ठेवुन पुर्वनियोजित पध्दतीने कट रचून श्रीपाद चिंदम टोळीतील देविदास मुदगल व त्याच्यासह 30 ते 40 जणांनी मिळून अ‍ॅड. दांगट यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामागचे सुत्रधार श्रीपाद छिंदम व मनोहर भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करावी, दांगट यांच्यावर मुदगल टोळीमार्फत नोंदविलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, त्यांच्या परिवारास पोलिस संरक्षण मिळावे या व इतर कांही मागण्यांबाबतचे निवेदन दि. 3 जुन रोजी पंढरपूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील, जिल्हाध्यक्ष दिपक वाडदेकर, तालुकाध्यक्ष रामदास घाडगे, शहराध्यक्ष लखन थिटे, शहर संघटक अक्षय साबळे, तालुका कोषाध्यक्ष शहाजी भोसले, तालुका उपाध्यक्ष शरद काळे, गोपी वाडदेकर, कृष्णा बागडे, वैभव गायकवाड, राकेश साळुंखे, अक्षय पवार, पांडुरंग खिलारे, अ‍ॅड. सागर आटकळे, परीट समाज युवक अध्यक्ष रामेश्‍वर साळुंखे, प्रफुल्लकुमार गोडसे, संदीप आटकळे, किशोर मोळक, महादेव पवार, कृष्णा वाघमारे, स्वप्नील आसबे, निलेश थोरात, माऊली हळणवर, विजयकुमार गायकवाड,   यासंदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील म्हणाले की, 
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *