👁 10 Views

आय. आय. टी. खरगपूरसाठी स्वेरीच्या दोघांची निवड आत्तापर्यंत ६० जणांनी गेट परीक्षेत मिळविले यश

पंढरपूर LIVE 5 July 2018डावीकडून प्रदीपकुमार जगदाळे, स्वेरी चिन्ह व विशाल सातपुते.

पंढरपूर- श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे प्रदीपकुमार सुमंतराव जगदाळे व सिव्हील इंजिनीअरिंगचे विशाल रत्नाकर सातपुते या दोघांची पुढील उच्चतंत्र शिक्षणासाठी (एम.टेक) आय आय टी खरगपूर (पश्चिम बंगाल) मध्ये निवड झाली असून स्वेरीतील अभ्यासाचे वातावरण, रात्र अभ्यासिका याचा फायदा झाला असल्याचे दोघांनी येथून आय. आय. टी. (इंडीयन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी )खरगपूर कडे रवाना होताना सांगितले. यापूर्वी गेट परीक्षेमध्ये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते तर एन.आय.टी (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी) मध्ये १० जणांन प्रवेश मिळाला होता.

             आय. आय. टी.साठी पात्र प्रवेश परीक्षा अर्थात गेट (ग्रज्यूएट अॅप्टिट्यूट टेस्ट फॉर इंजिनीअरिंग) परीक्षा उत्तीर्ण होवून आय. आय. टी.करिता विद्यार्थ्यांची निवड व्हावी यासाठी महाविध्यालयात व्यवसायिक शिक्षकांकडून वेळोवेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिले जाते. त्यानंतर ऑनलाईन सराव परीक्षा घेतली जाते. यासाठी नियमितच्या अभ्यासाव्यतिरिक्त स्वतंत्र अभ्यासिकेची सोय देखील स्वेरीमध्ये करण्यात आली आहे. याचाच फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. या वर्षी आय. आय. टी. खरगपूरसाठी स्वेरीच्या दोघांची निवड झाली. त्यापैकी मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातून  प्रदीपकुमार जगदाळे यांनी अंतिम वर्षात ७५.३१ इतके गुण मिळविले व पुढे त्यांनी गेट परीक्षेत ७३.९१ गुण (७६४ स्कोर) मिळाले आहेत त्यांना ‘ओशिएन इंजिनिअरींग अॅण्ड नेव्हल आर्किटेक्चर’ या विभागात प्रवेश मिळाला आहे. तसेच सिव्हील इंजिनीअरिंगचे विशाल सातपुते यांना गेट परीक्षेत ४८.३५गुण (५६४ स्कोर) मिळाले आहेत. त्यांना आय. आय. टी. खरगपूर मध्ये ‘वॉटर रिसर्च इंजिनीअरिंग’ विभागात प्रवेश मिळाला आहे.  यशस्वी विद्यार्थ्यांनी या निवडीचे श्रेय स्वेरीमध्ये ‘द्वितीय वर्षापासून गेट परीक्षेची तयारी करून घेणे’  व ‘पंढरपूर पॅटर्न’ मुले वेळच्या वेळी अभ्यास करण्याच्या  सवयीला दिले. आत्तापर्यंत आय. आय. टी. प्रवेशासाठी पात्र परीक्षा, गेट मध्ये ६० विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून हा एक विक्रमच आहे. दोघांनाही संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगेमेकॅनिकल इंजिनीअरिंगचे विभागाचे प्रमुख प्रा. सचिन गवळीसंशोधन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच यावर्षी महाविद्यालयातील एकूण १५ विद्यार्थी आर.टी.ओ. तर संतोष माळी हे यु.पी.एस. सी. स्पर्धा परीक्षेत ६१२ वे रँक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत असे अनेक गौरवास्पद कामगिरीमुळे विद्यार्थी आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोठ-मोठ्या शहराकडे न वळता स्वेरी महाविद्यालयाकडे वळत आहेत. प्रदीपकुमार जगदाळे व विशाल सातपुते दोघा विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, संस्थेचे इतर विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ.सतीश लेंडवे, प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, शैक्षणिक कार्याचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, सर्व अधिष्ठाता, वर्गशिक्षक, प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.  

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *