पंढरपूर LIVE 5 July 2018
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ]
एकाच वस्तीत राहणाऱ्या चार जिवलग मित्रांचे स्वभाव / वृत्ती वेगवेगळे असले तरी ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात, ह्या मध्यवर्ती कल्पनेवर निर्माते विठ्ठल पाटील, गौतम गुप्ता, मधू मंटेंना यांनी त्यांच्या विठ्ठल पाटील प्रॉडक्शन, फ्यूचरवर्क्स मीडिया लिमिटेड, फँटम फिल्म्स या चित्रपट संस्थेतर्फे ” यंग्राड ” ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची कथा–पटकथा–दिगदर्शन मकरंद माने यांचे असून,गीते क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील, माघलुब पुनावाला यांची असून हृदय आणि गंगाधर यांनी संगीत दिले आहे. या मध्ये चैत्यन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ, जीवन करळकर, शशांक शेंडे, शरद केळकर, सविता प्रभुणे, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, विठ्ठल पाटील, शंतनू गणगणे, हे कलाकार आहेत,
या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार आणि दिगदर्शक यांची भेट घेतली त्यावेळी दिगदर्शक मकरंद माने यांनी सांगितलं कि यंग्राड हा शब्द यंग आणि राडा या दोन शब्दांचे मिश्रण करून बनवला आहे, मुलांच्या भावविश्वात टूकारपणा असतो, दंगामस्ती करणारी मुले असा त्याचा अर्थ होऊ शकतो, मुले टुकार आहेत म्हणजे मुलांची वृत्ती ह्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला जातो, टूकारपणा म्हणजे खोडसाळपणा प्रत्येक मुलं हि काहींना काही प्रमाणात खोडकरपणा करीत असतात पण त्याला बंधन हवे, मला कुठे थांबायचं हे त्या मुलांना माहित असायला हवे.
पालक आणि मुलगा यांचे नातेसंबंध कसे असावेत आणि आहेत ह्यावर हा सिनेमा भाष्य करतो, पालकांचं लक्ष मुलाकडे किती प्रमाणात आहे ह्यावर सुद्धा सिनेमा भाष्य करतो. ह्या मुलामुलांचे मित्र–मैत्रिणी असतात, त्यांच्या किशोर वयात त्यांना वाटते कि आपले भावविश्व म्हणजे आपले मित्र–मैत्रिणीचं आहेत. मित्रांच्यामध्ये कोणी चुका केल्या तर दुसऱ्या मित्राने त्याला समजावून सांगितलं पाहिजे अर्थात त्याला नीट समज दिली पाहिजेच. हि विक्या, बाप्पा, अंत्या, मोन्या ह्या चार मित्रांची कथा आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत
विक्या ची भूमिका हि चैतन्य देवरे करतो तो म्हणाला कि हा विक्या निर्णय घेण्यात पटाईत आहे, खूप समजूतदार असून तो निर्णय अचूक घेतो,, बाप्पा ची भूमिका जीवन करळकर करतोय तो म्हणाला ह्या मुलाला फक्त खाणं आणि मौज मस्ती करणे इतकेच माहित असते, तसा तो शांत असतो पण तो आपली प्रतिक्रिया लगेच देत नाही. ,, अंत्या ची भूमिका सौरभ पाडवी करतोय त्यांनी सांगितलं कि, हा अंत्या कोणालाच दुखवत नाही, अंत्याचे वडील हे घाटावर श्राद्ध पक्ष अशी धार्मिक कार्ये करीत असतात, ह्या कामात अंत्याला रस नसतो, त्याला हा वडिलांचा व्यवसाय आवडत नाही, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून तो त्यांच्या बरोबर काम करीत असतो.,,, मोन्या ची भूमिका शिवा वाघ करतोय ह्या शिवाला दुनियेची कसलीच फिकीर नसते किंवा तो ह्या गोष्टी चा विचार करीत नाही, तो आपल्याच मस्तीत गुंग असतो, तो मित्रांसाठी काही सुद्धा करण्यासाठी तयार असतो, अत्यंत धाडसी असा हा मुलगा आहे.
हि सगळीच मुले शाळेत जाणारी आहेत, ह्या मुलांची मैत्री लहानपणा पासून असते सारेजण घाटावरच्या एका वस्तीमध्ये हे सारे राहत असतात.नाशिक निवडण्याचे कारण म्हणजे तेथील नदीवर असलेला घाट आणि त्या घाटाच्या आजूबाजूला बसलेलं शहर आहे, ह्या सिनेमाची कथा हि विक्याच्या भोवती गुंफली आहे. त्याची तेजू नावाची मैत्रीण आहे ती भूमिका शिरीन पाटील हि साकारते आहे, हि मुलगी साधी सरळ स्वभावाची आहे. शाळा घर आणि मैत्रीण ह्या भोवतीच तिचे आयुष्य असते तिला खोडसाळपणा अजिबात आवडत नाही.
शशांक शेंडे यांनी विक्याच्या वडिलांची भूमिका केली आहे, ते म्हणाले कि, आपल्याकडे मुलगा आणि वडील यांच्या नात्यामध्ये अंतर राखलेलं दिसून येतं , आजच्या काळात ते बदललेलं आहे, ” ओ बाबा च्या ठिकाणी ए बाबा ” पर्यंत आलं आहे, असे असलं तरी वडील मुलगा ह्याचं नातं हे घट्ट आहे. विक्या आणि त्याचे वडील यांच्यात संवाद नाही पण विसंवाद सुद्धा नाही, तारुण्य सुलभ वयातील मुलगा जसा वागायला हवा त्याप्रमाणे विक्या वागत असतो, पण त्याने बालपण हे जपलं पाहिजे त्यांच बरोबर जबाबदारीची जाणीव सुद्धा ठेवायला हवी, खरं म्हणजे खोडकरपणा, वांडपणा आणि गुन्हेगारी ह्या मध्ये एक अंधुकशी रेषा आहे ह्याची जाणीव ठेवायला हवी, त्यामुळे खोडकरपणा, दंगा–मस्ती करत असताना ती मुले गुन्हेगारी कडे कधी वळतात हे त्याना हि कळत नाही, गुन्हेगारी करून जो आलेला पैसा असतो तो खरं तर आपला नाही, तो दुसऱ्याचा आहे, दुसऱ्या कोणाचे सुख आपण ओरबाडून आणतो आहोत हे पालकांनी मुलांना सांगायला पाहिजे.
यंग्राड हा सिनेमा पालक आणि मुले ह्यांच्या नातेसंबंधावर भाष्य करतो.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com