👁 8 Views

संभाजीराजे – दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार?

पंढरपूर LIVE 5 July 2018

दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ]

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा छडा लवकरच लागणार आहे. हे प्रकरण आहे संभाजीराजे आणि दिलेर खान…

संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. वेगवेगळ्या नाटककादंबऱ्यांमधून वेगवेगळं चित्र रंगवण्यात आलं आहे. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते… काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले… मला इथे संधी मिळत नाहीतर तिथे जाऊन कर्तृत्व गाजवतो. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. यामुळे त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत विविध विचार आहेत. असं असताना स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये काय दाखवलं जाणार याबाबत उत्सुकता वाढणं साहाजिक आहे.

आता स्वराज्यरक्षक संभाजी मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. तिथे नेमकं काय आहेअसं असताना खरा इतिहास टप्प्याटप्प्याने समोर आणणाऱ्या या मालिकेत हे प्रकरण कशा पद्धतीने दाखवण्यात येईल हे बघणं कुतूहलाचं ठरणार आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असोवा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं… या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय. 

आता संभाजीराजे- दिलेर खान प्रकरण हा फार मोठा पेच मालिकेत आला आहे. हा पेच  आता कसा सुटणार याकडे  प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. जुलै महिन्यात याचा उलगडा होणार असल्याने हा महिना प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचा आणि मालिकेसाठी कसोटीचा असणार आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *