👁 9 Views

रमाई आवास योजनेसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडून 7 कोटी 21 लाख रुपये मंजुर… नगरसेवक डि.राज सर्वगोड यांच्या पाठपुराव्याला यश!

पंढरपूर LIVE 12 July 2018

अखेर रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय मिळाला…
गेल्या जवळपास एक वर्षापासून पंढरपूर शहरात रमाई घरकुल योजनेच्या 261 लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतिक्षा होती. मात्र निधीच उपलब्ध होत नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता,घरकुलाच्या निधीची चौकशी करण्यासाठी अनेक लाभार्थी सातत्याने नगर पालीकेत हेलपाटे मारत असल्याचे निदर्शनास येताच घरकुलापासून वंचित राहीलेल्या लाभार्थ्यांना तातडीने निधी उपलब्ध करण्यात यावा यासाठी नगरसेवक डि.राज सर्वगोड व दलितमित्र दुर्योधन यादव यांनी पुणे विभागीय आयुक्तांची भेट घेवून निवेदन दिले होते व आषाढी एकादशी महापुजेसाठी येणार्‍या मुख्यमंत्र्याच्या मार्गावर धरणे आंदोलन केले जाईल असा  इशाराही दिला होता.मात्र त्यानंतरही कार्यवाही होण्यास उशीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना.रामदास आठवले,राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले ,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची मुंबई येथे भेट घेवून त्यांच्याकडे निवेदनाद्वारे अनुदान उपलब्ध करण्याची मागणी केली होती.या पाठपुराव्यास अखेर यश आले असून समाजकल्याण आयुक्त पुणे यांनी 7 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर केला आहे.

                 

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

या बाबत अधिक माहीती देताना नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की,रमाई आवास योजनेतून घरकुलास मंजुरी मिळूनही केवळ निधी अभावी गेल्या सुमारे वर्षभरापासून लाभार्थी घरकुलापासून वंचीत होते.एकीकडे केंद्र  व राज्यशासन सर्वांसाठी घरे या सारख्या योजनांचा मोठा गवगवा करीत असतानाच घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना मात्र निधीअभावी वंचीत ठेवले गेले होते.आपण यासाठी पुणे विभागीय आयुक्तांची दोन वेळा भेट घेतली व निवेदनाद्वारे त्यांच्याकडे निधी उपलब्ध करण्याची मागणीही केली.त्याच बरोबर समाजकल्याण आयुक्त श्री शंभरकर यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला.तरीही कार्यवाही होत नसल्याचे लक्षात येताच केंद्रीय समााजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मी आणि दलितमित्र दुर्योधन यादव यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून देताच त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते.अखेर आता या घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्याने रमाई आवास योजनेच्या वंचीत 261 लाभार्थ्यांना न्याय मिळणार आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *