👁 9 Views

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आज ‘पंढरीची वारी’ या विषयावर महाचर्चा.. श्री विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवरांचा सहभाग

पंढरपूर LIVE 12 July 2018

पंढरपूर, ता. 11 : दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून निर्मित ‘महाचर्चा’ या कार्यक्रमात आज (गुरुवारी दि. 12 जुलै) ‘पंढरीची वारी’ या विषयावर चर्चा होणार असून, यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी अध्यक्ष ऍड. शशिकांत पागे आणि ज्येष्ठ माध्यमतज्ञ सुधीर गाडगीळ सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून गुरुवार दि. 12 जुलै रोजी रात्री 8 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती आणि प्रशासनाने केलेली तयारी, वारीची महती, वारीचे अध्यात्मिक महत्व या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. या थेट प्रसारित चर्चेत दुरध्वनीद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू आणि मंदिर समितीचे अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ढोले सहभागी होणार असून, संजय भुस्कुटे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निर्मिती प्रमुख जयु भाटकर हे आहेत. कार्यक्रमाचे पुनःप्रसारण शनिवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *