👁 8 Views

पंढरपूर सिंहगडाच्या ०५ विद्यार्थ्याची एम.ई.पी. कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 17 July 2018

·              गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच पंढरपूर सिंहगडचे ध्येय
पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ०५ विद्यार्थ्यांची भारतातील एक नामवंत असलेल्या एम.ई.पी. या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन सिव्हिल इंजिनिअरींग विभागातुन मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखत मधून अजय यमगर, महेश पताळे, सागर गोरे, तुषार मोरे, विठ्ठल घाडगे आदी विद्यार्थ्यांची एम.ई.पी. कंपनीत निवड झाली. या निवडीमुळे विद्यार्थी वर्गात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
    पंढरपुर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एम.ई.पी. या नामवंत कंपनीत काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळे पालकांमधुन आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडी दरम्यान कंपनी कडून घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक व तांत्रिक चाचणी घेण्यात आली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त, समर्पक, योग्य व अचूक उत्तरे दिल्यामुळे कंपनीच्या अधिका-र्यांनी संतोष व्यक्त केला. कंपनीत आवश्यक असलेले गुण पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थ्याकडे दिसून आल्यामुळे ०५ विद्यार्थ्याची निवड मुलाखतीतून करण्यात आली.
       पंढरपुर सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांची शिस्तसभ्यतागुणवत्तापरिक्षेत मिळाले गुण व सामान्य ज्ञान या सर्वांचा अभ्यासपुर्ण असा विद्यार्थी घडविण्याचे काम तज्ञ प्राध्यापक करीत असल्यामुळे सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विविध कंपनीत निवडला जात आहे. प्लेसमेंट मधुन आजपर्यत ८०० हून अधिक विद्यार्थी  आज जगातील नामवंत क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीत पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थी नोकरी करून स्वतःचे करिअर घडवित आहे. एस् के एन् सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालय अभियांत्रिकी शिक्षणासाठी नावाजलेले कॉलेज आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसत आहे.
       निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. अमोल क्षीरसागरप्रा. दिपक कोष्टीप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. सोमनाथ कोळी आदीनी अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
टीप :- पंढरपुर सिंहगड महाविद्यालयातील एम.ई.पी. कंपनीत निवड झालेल्या ०५ विद्यार्थ्यांचा फोटो बातमीत वापरावा.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *