👁 9 Views

मोबाईल हॅन्डवॉशचा उुपक्रम उपयुक्त – पालकमंत्री विजय देशमुख

पंढरपूर LIVE 17 July 2018

पंढरपूर दि. 16 : जिल्हा परिषदेने आषाढी वारीत वारकऱ्यांना हात धुण्यासाठी  राबविलेला मोबाईल हॅन्डवॉश (हात धुणे रथउपक्रमउपयुक्त  आहेअसे उपक्रम राज्यात भरणाऱ्या मोठ्या यात्रेत राबविल्यास त्याचा लाभ भाविकांच्या आरोग्यासाठी  होईलअसे मत पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केले.
आषाढी वारी सोहळ्यासाठी  उद्यापासून संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. यानिमित्ताने भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री देशमुख यांनी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर त्यांच्या हस्ते मोबाईल हॅन्ड वॉशचे उद्घाटन करण्यात आले.
बैठकीस आमदार प्रशांत परिचारक,  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, मा. मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय आदी उपस्थित होते.
आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सेवा सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी संबंधित विभागांनी पुन्हा एकदा आपल्याकडील कामांचा व सेवांचा आढावा घ्यावा. वारी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. शहरात मुबलक पाणी, अखंडीत वीज पुरवठा यावर लक्ष केंद्रीत करावे. मंदीर समिती, पोलीस यंत्रणा, नगरपालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांसह संबंधित विभागांनी वारकऱ्यांना सुविधा देण्यात दक्ष रहावे. पालखी तळ व शहरात उभारण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध ठेवाव्यात.
शासन स्वच्छतेबाबत तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर आहे. जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालखी मार्ग,पालखी तळ,आणि पंढरपुरात आषाढी वारी कालावधीत भाविकांसाठी हा धुणे रथ तयार करण्यात आला आहे. वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले. आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांची स्वच्छतेबाबत जिल्हा प्रशासन घेत असलेली काळजी हे राज्यात स्वच्छतेचे संस्कार गतिमान होत असलेचे प्रतिक आहे, स्वच्छतेबाबत प्रशासनाने केलेले काम  कौतुकास्पद आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
            वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी ,त्यांना स्वच्छतेचे महत्व समजावे यासाठी जिल्हा परिषदेचा हात धुणे उपक्रम स्तुत्य असल्याचे जिल्हाधिकारी भोसले म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी हात धुणे उपक्रमाबाबत माहिती दिली.
तत्पूर्वी मा. मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील आपत्कालीन निवारण कक्ष पत्राशेड, 65 एकर येथील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.
बैठकीस अकलूजच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसिलदार मधुसूदन बर्गे, बाई माने, मुख्याधिकारी अभिजीत बापट, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी विशाल बडे उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *