पंढरपूर LIVE 17 July 2018
पंढरपूर, दि. 17 : सांस्कृतिक कार्य संचालनालय, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि विट्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने आषाढी एकादशी आणि वारीच्या पार्श्वभूमीवर भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 18 जुलै रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वेळेत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज भवन येथे होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहायक संचालक संजीव पलांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये सकाळी 10 ते 12.30 वाजेपर्यंत विठ्ठल नामाची शाळा भरली, असा पंढरपुरातील 7 शाळांमधील विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होणार आहे. शासकीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्थानिक व नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे सातत्याने करत असतात. त्यानुसार भक्ती महोत्सवाची सुरुवात पंढरपुरातील सुमारे 150 शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 1 ते 3 या वेळेत वागमी एंटरटेनमेंट प्रस्तुत अवघाची विठ्ठलअसा भक्तीसंगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 या वेळेत चंद्रभागेच्या तिरी कार्यक्रम होईल. तर रात्री 7 ते 10 या वेळेत पाऊले चालती पंढरीची वाट हा 50 कलाकारांचा समूह असलेल्या नृत्य, नाटिका व संगीत कार्यक्रम होणार आहे.
आषाढ महिन्याच्या प्रतिपदेपासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी सुरू होते. त्यांना भक्तीरसाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविण्यासाठी संत तुकाराम महाराज भवन येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्व रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव पलांडे यांनी केले आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com