पंढरपूर LIVE 19 July 2018
मराठा व धनगर समाजाचे प्रश्न सोडविेले तरच येत्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करु… अन्यथा राज्य सरकारशी कसलीही चर्चा करणार नाही व मुख्यमंत्र्यांना निवेदनही देणार नाही, त्यांना भेटायचे सुध्दा नाही तर मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून गनिमी काव्याने रोखायचे! असा निर्णय मराठा क्रांती मोर्चा, राज्य धनगर आरक्षण समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आषाढी यात्रेच्यावेळी पंढरीत येणार्या मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखण्याचा इशारा या तिन्ही संघटनांनी दिला असून आंदोलन सुरू केलेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दराचे आंदोलन सुरू असून या आंदोलनास मराठा क्रांती मोर्चा, धनगर आरक्षण कृती समितीने पाठींबा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास येथील जाधव जेठाभाई मठात मराठा, धनगर समाजासह स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त बैठक झाली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखण्याचा निर्धार कायम असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्य सरकारने आजवर केवळ सकारात्मकता दाखवून चर्चेत वेळ घालवला आहे. त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतला तरच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करू अन्यथा त्यांच्याशी कसलीही चर्चा करायची नाही, त्यांना निवेदनही द्यायचे नाही असा निर्णय यावेळी सर्वांनी घेतला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी यावेळी दुध दरावर तोडगा जरी निघाला तरी मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी संघटना दोन्ही समाजांसोबत आंदोलनात असेल अशी ग्वाही देण्यात आली. येत्या 23 तारखेला शासकीय महापुजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी गनिमी काव्याने आंदोलन करण्यासंदर्भात सर्व संघटनांनी एकत्रीत चर्चा केल्याचे समजते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com