👁 7 Views

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठोस आश्‍वासन द्या-आमदार भालके

पंढरपूर LIVE 19 July 2018

मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा ही सर्व राज्याची पूजा असते ही पूजा व्हावी म्हणुन आपण मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठोस आश्वासन द्यावे असा आग्रह आ भारत भालके यानी गुरुवारी मराठा धनगर समाजाच्या आरक्षणा सन्दर्भात लक्षवेधी सूचने द्वारे केला

 आषाढ़ी वारी च्या पार्श्वभूमीवर मुख्य्मंत्री देवेंद्र फडणवीस याना महापुजेस येऊ देणार नाही असा इशारा मराठा क्रांति मोर्चा च्या आयोजकानी दिला  या पाठोपाठ धनगर समाजाच्या आरक्षणा बाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यांनी ही महापूजा करू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने वाऱीच्या तोंडावर मोठा पेच निर्माण झाला आहे यावर आपली भूमिका काय आहे असा सवाल मतदार संघाचे आ भारत भालके यांनी केला
सभागृहात मुख्यमन्त्री उपस्थित होते यावर आ भारत भालके म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून ही पूजा व्हावी म्हणून मी सहकार्य करायला तयार आहे चन्द्रकान्त दादा आपण उद्या जर पंढरपुरात आलात तर आपण आंदोलनकर्त्याशी बोलू त्यासाठी सभागृहात आज ठोस आश्वासन दया मात्र नाही दिले तर दहा लाखांचे मोर्चे शांततेत निघाले आता त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला आहे आता नाही तर पुन्हा नाही अशा विचाराने तरुण पेटले आहेत आपण या सभागृहात ठोस निर्णय द्यावा अशी भूमिका आ  भारत भालके यानी मांडली
 यावर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाला राज्य सरकारने मंजूरी दिली होती मात्र उच्च नायालयाने यास स्थगिती दिली सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले तिथे दिलासा न मिळाल्याने आपण उच्च न्यायालयात दाद मागितली यावर मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली मात्र आयोगाचे प्रमुख दिवंगत झाले नंतर जस्टिस गायकवाड़ हे काम पाहत आहेत जिल्ह्याच्या विभागाच्या  स्थानी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करीत आहेत यावर न्यायालयाने स्वता आयोगास केव्हा पूर्तता होणार आहे विचारणा केली आहे तर आयोगाने प्रतिज्ञापत्र दिले असून आयोगाच्या अहवालाच्या आधारेंच मराठा आरक्षणांचा निर्णय उच्च न्यायालयात होणार आहे
 राज्य सरकार न्यायालयाची प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे ही बाब आपण सर्वानी समाजा पुढे मांडली पाहिजे न्याय प्रविष्ट विषय आहे राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आश्वस्थ आहे शिवाय नोकरभरती बाबत ७२ हजार जागांची मोठी भरती होणार आहे शिवाय मराठा समाजाला आरक्षण झाल्यास पुढील भरती मध्ये १६ टक्के अतिरिक्त जागा देण्यात येतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले
 धनगर समाजाबबत राज्य सरकार वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे टी आय एस एच ने पाच राज्यातील ३६ जिल्ह्याचा सर्वे पूर्ण झाला आहे अहवाल तयार असून केंद्र सरकार कड़े आपण शिफारस करणार आहोत  
या प्रकरणाचे राजकारण होऊ नये पंढरपुर सारख्या भक्तिमय ठिकाणी आंदोलन करू नये असे राजकारण करणे अयोग्य असेल आंदोलनासाठी शंभर जागा आहेत मराठा समाजाला अनेक सवलती सुरु केल्या आहेत विरोधी पक्षांना विनंती आहे की भाविकाना त्रास होईल अशी कृती कोणीही करू नये

वारकरी कसा पांडुरंगाचे दर्शन कसे घेणार?२३ तारखेला आषाढ़ी साठी राज्यातून अनेक पालख्या येतात दोन दिवस आधी पंढरपुरात वारकऱ्यांची संख्या बारा लाखांच्या घरात असते वारकरी शांतता प्रिय असणारा वर्ग आहे संघटना जर न्याय मागण्यांसाठी हिंसक होत असतील बस वर दगडफेक होत आहे पंढरपूर काही ठिकाणी बंद होण्याची स्थिती असेल तर वारकरी कसा पांडुरंगाचे दर्शन घेणार असा प्रश्न सभागृहात आ. भालके  यांच्या कडून उपस्थित झाला.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *