👁 9 Views

भागवत एकादशीला हजारो भाविकांनी घेतले परळीच्या श्रीवैद्यनाथाचे दर्शन… वैद्यनाथ मंदिर व जगमित्र नागा मंदिरात भक्तांची रिघ….

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018

परळी दि.08
    आषाढ कृ.प .12 भागवत एकादशी निमित्त सोमवारी हजारो भाविकांनी श्री प्रभु वैद्यनाथाचे व श्री संत जगमित्र नागाचे दर्शन घेतले. परळी, अंबाजोगाई, गंंगाखेड तालुक्यातील पायी दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.  तसेच राज्य व परराज्यातुनही सोमवारी भाविकांची गर्दी झाली होती.  त्यामुळे गर्दीने परळी शहर फुलले होते. 
    वैद्यनाथाच्या पायर्‍यावर श्रावण महिन्याच्या अनुषंगाने लोखंडी बॅरिकेटस लावण्यात आलेले आहेत. या नागमोडी आकाराच्या बॅरिकेटस मधे सोमवारी हजारो भाविकांची रांग लागली होती. शांततेत भाविकांनी दर्शन घेतले. मोठी गर्दी असुनही कांही गडबड झाली नाही. पहाटे पासुनच भागवत एकादर्शीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वैद्यनाथ मंदिरात रिघ लागली होती. सकाळी 9 च्या नंतर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. परळी तालुक्यातील नंदागौळ, धारावती तांडा, वागबेट तसेच अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर व परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तुक्यातील करम उक्कडगाव व इतर गावच्या दिंड्या आल्याने सोमवारी परळी शहर दुमदुमले होते. श्री.संत जगमित्र नागा मंदिरातही भाविकांची मोठी रिघ लागली होती.येथील  संत जगमित्र नागा मंदिरात मोठी  एकादशी निमित्त  बुधवारी  भाविकांची मोठी गर्दी झाली. श्री जगमित्र  नागा समाधी व श्री विठ्ठल रुक्मिाईचे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.  जगमित्र नागा मंदिरातही हजारो भाविकांनी दर्शन घेतले. वैद्यनाथ व जगमित्र नागाचे दर्शन घेतल्याने आपण प्रसन्न झालोत असे निवृत्त पोलिस निरीक्षक रामकृष्ण चाटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले. 
    परळी तालुक्यातील धारावती तांडा येथील बंजारा समाजाच्या महिलांनी वैद्यनाथ मंदिरात देवाचे गाणे म्हणले व  फुगडी खेळली. धारावती तांडा व परिसरातील महिलांनी मंदिरात येऊन वैद्यनाथाचे दर्शन घेतले. असे धारावती तांडा येथील चंद्रकला पवार यांनी सांगितले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *