👁 9 Views

शासनाच्या सर्व योजना सफाई कर्मचा-यांपर्यंत पोहोचवा. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018

पंढरपूर येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (भारत सरकार) चे सदस्य मा.श्री.दिलीप हाथीबेड यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, आरोग्याधिकारी डॉ.संग्राम गायकवाड, पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, कार्याध्यक्ष नाना वाघमारे, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, सह.कार्याध्यक्ष शरद वाघमारे, उपाध्यक्ष किशोर खिलारे, संतोष सर्वगोड, भारतीय मजदुर सफाई कॉँग्रेसचे अंबालाल दोडिया या कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यां समवेत सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नाबाबत शासकीय विश्रामधाम बैठक संपन्न झाली.
यावेळी सफाई कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने सफाई कर्मचा-यांच्या लाड बर्वे मलकानी कमिटीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचा-यांच्या वारसांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. तसेच पंढरपूर शहराची लोकसंख्या, शहरामध्ये भरणा-या चार मोठ्या यात्रा, तरंगती लोकसंख्या व शहराचा होणारा वाढता विस्तार लक्षातच घेता सध्याची असणारी ३६३ सफाई कर्मचारी संख्या अतिशय अपुरी आहे. पंढरपूर शहरामध्ये वर्षभरामध्ये सुमारे १ कोटी भाविक येत असतात व आषाढी यात्रा कालावधीमध्ये कायम ३६३ कर्मचारी व ७०० तात्पुरते कर्मचारी येणा-या १५ ते १६ लाख भाविकांना सेवा देत असतात. त्यामुळे १० ते १५ हजार भाविकांमागे १ सफाई कर्मचारी काम करतो. त्यामुळे सफाई कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढतो. तरी वरील सर्व बाबी विचारात घेता पंढरपूरसाठी किमान ५०० ते ७०० कायम सफाई कर्मचारी असणे आवश्यक आहे. सन १९६५ पासुन ज्या सफाई कर्मचा-यांच्या वारसांना नियुक्ता मिळालेल्या नाहीत त्यांच्यासाठी व शहरातील इतरांना सुद्धा रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नविन पदांची निर्मीती करणे आवश्यक असल्याचे पंढरपुर नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी सांगितले. यावर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी नगरपरिषदेने आवश्यकतेनुसार नविन पदनिर्मीतीचा प्रस्ताव मा.संचालक मुंबई यांच्याकडे सादर करावा. याबाबत मी स्वतलक्ष घालुन सफाई कर्मचा-यांना न्याय मिळवुन देईन असे आश्वासन दिले. तसेच सफाई कर्मचा-यांची वर्षातुन २ वेळा आरोग्य तपासणी करावी. सफाई कर्मचा-यांना त्यांना स्वतव त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय लाभ मिळण्याच्या दृष्टीने गट विमा उतरविण्यात यावा. शासन सध्या महाराष्ट्रासह देशातील ज्या व्यक्तींना स्वतमालकीचे घर नाही अशा व्यक्तींसाठी पंतप्रधान आवास योजन अंतर्गत घरे बांधुन देण्याचा अतिशय चांगला उपक्रम राबवित आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेमधील सर्व सफाई कर्मचा-यांना त्यांना स्वत:चे हक्काचे घर मिळण्याच्या दृष्टीने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्व सफाई कर्मचा-यांना घरे देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करुन या योजनेचा लाभ मिळवुन द्यावा.  अशा सुचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिल्या. यावेळी सर्व संघटनांच्या पदाधिकार-यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे यांनी केले. मा. दिलीप हाथीबेड यांचा सत्कार व स्वागत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले. आभार मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले. यावेळी आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, दर्शन वेळापुरे, श्रीशैल चाबुकस्वार हे उपस्थित होते.  

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *