👁 6 Views

पंढरपुरात १३७ भाविकांना उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं झाली विषबाधा

 

पंढरपुर येथून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपुरात अनेक वारकरी हे विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी ही केली होती.


यावेळी दर्शनासाठी आलेल्या तब्ब्ल १३७ भाविकांना जेवणातून विषबाधा ही झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात अनेक वारकरी हे विठुरायाच्या दर्शनासाठी आले होते यावेळी भाविकांनी एकादशी दिवशी भगर अन् आमटी खाली होती. त्यामधून तब्ब्ल १३७ भाविकांना विषबाधा ही झाली आहे. त्या सर्व भाविकांना आज दि २ फेब्रुवारी रोजी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मागील २५ वर्षापासून मनाठा ते पंढरपूर अशी दिंडी येते. या दिंडीत भाविक नादेंड व हिंगोली जिल्ह्यातील लोक १८५ च्या आसपास पायी चालत येतात. यंदा माघी यात्रा सोहळा साजरी करण्यासाठी दिंडी ३१ जानेवारी रोजी पंढरपुरात आले. त्यांनी पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केला. त्या भाविकांनी एकादशीच्या उपवासामुळे बुधवारी भगर अन् आमटी खाली. परंतु त्यांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मळमळ, उलट्या व चक्करचा त्रास सुरू झाला. 


ही माहिती मिळताच त्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिका पोहचली. त्या सर्वांवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे. ही माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कूचेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंढरपूर शहरातील मर्दा या दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अन्न औषध प्रशासनाने विषबाधा झालेल्या अन्न पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *