👁 5 Views

मोहोळ शहरात दोन लाखाची घरफोडी ….

 

मोहोळ : शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या दत्त नगर व सोमराय नगर या भागात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने २ लाख ९७ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना ता ३१ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.



या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मनिषा सागर देशमुख वय २९ रा. दत्त नगर मोहोळ या त्यांचे पती सागर देशमुख हे आजारी असल्याने सोलापूर येथील रुग्नालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या देखरेखी साठी श्रीमती देशमुख या रूग्नालयातच होत्या.ता १ रोजी सकाळी ७:३० वाजता त्यांचे शेजारी असणाऱ्या जयश्री अवताडे यांनी त्यांना फोन करून सांगितले की, तुमच्या घराचा कडी कोयंडा तुटलेला आहे.

घरामध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहे. त्यांनी तात्काळ घरी येऊन घराची पहाणी केली असता, घरातील लोखंडी व लाकडी कपाट फोडलेले दिसले व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसुन आले. लोखंडी कपाटाची पहाणी केली असता कपाटातील चोर कप्यात ठेवलेल्या सोन्याच्या आंगठ्या रिंग खडे व चैन असे सोन्याचे अंदाजे २ लाख १ हजार रुपये किंमतीचे दागिने दिसुन आले नाहीत.

ता ३१ रोजी रात्री सुरेखा नागनाथ कुचेकर रा.सोमराय नगर मोहोळ यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी व कोयंडा उचकटुन घरामध्ये प्रवेश करुन देवघरात असलेल्या लोखंडी कपाटातून सोन्याच्या रिंगा ,गुंड, आंगठ्या ,टॉप्स व रोख ४ हजार पाचशे रुपये असे ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.दोन्ही घरफोड्यात अज्ञात चोरट्यानी एकूण २ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.असे मनीषा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


दरम्यान पोलीसांनी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले होते.मात्र घरातील सदस्यांनी वस्तु हाताळल्याने ठसे तज्ञांच्या हाती कांही लागले नाही तर श्वान ही तेथेच घुटमळल्याचे या घटनेचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे यांनी सांगीतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *