👁 8 Views

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे तहसिलदार मदुसूधन बर्गे यांचे आवाहन

पंढरपूर LIVE 11 ऑक्टोबर 2018


पंढरपूर, दि. 10 :-  गोर रुबेला लसीकरण मोहीमेची आरोग्य  विभागाने प्रभावी जनजागृती करावी. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संस्था व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार मदुसूधन बर्गे यांनी आज येथे केले.
            येथील पंचायत समितीच्या शेतकी सभागृहात टास्क र्फोस समितीची बैठकीत  27 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2018 या कालवधीत राबविण्यात येणाऱ्या गोबर रुबेला लसीकरण मोहीमेची माहिती देण्यात आली. बैठकीस पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, गट विकास अधिकारी  रवीकिरण घोडके, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. ज्योती लांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांच्यासह शिक्षण विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी, सामाजिक संस्था व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.
            तहसिलदार बर्गे म्हणाले, पंढरपूर तालुक्यात लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक शाळेत पालक-शिक्षक संवाद मेळावा घ्यावा. लसीकरणाबाबत सर्वाना माहिती होण्यासाठी समाजातील मान्यवर व्यक्ती, बालरोग तज्ज्ञ यांचे ऑडिओ, व्हिडीओ क्लिप तयार करुन  त्या सोशल मिडियावर प्रसिद्ध कराव्यात. पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविली त्याच प्रमाणे गोबर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवून गोबर रुबेलाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करावेत. 
             सर्व शाळाअंगणवाडीप्राथमिक आरोग्य केंद्रत्याचबरोबर विविध सामाजिक ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे. नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील  मुलां मुलींना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागआरोग्य विभागमहिला बालकल्याण विभागाने मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.
            जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. ज्योती लांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी गोबर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत माहिती दिली.
यावेळी  तालुक्यातील राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *