👁 8 Views

“आपला माणुस संतोषभाऊ नेहतराव” मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम… पंढरपूर शहर व परिसरातील गुणीजनांना दिला सन्मान! सज्जनांचा गौरव करुन दिली नवी प्रेरणा..!

पंढरपूर LIVE 15 ऑक्टोबर 2018


“आपला माणुस संतोषभाऊ” नेहतराव मित्र  मंडळानं एक अनोखा उपक्रम राबवलाय. पंढरपूर शहर व परिसरातील गुणीजणांना सन्मान देऊन अशा गुणीजणांसारखं कार्यकर्तृत्व करण्याची प्रेरणा नव्या पिढीला देण्याचं प्रशंसनीय कार्य संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळानं केलंय


खाली क्लिक करुन बघा सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट



संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळ व क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरूण मंडळ तरूण महोत्सव 2018 यांच्यावतीने गेल्या वर्षीपासून सामाजिक क्षेत्रामधील व पंढरपूर ज्या व्यक्तींनी पंढरपूरचे नाव विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णाक्षरात उमटविले अशा कर्तबगार ज्येष्ठ व्यक्तींना सामाजिक गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

यामध्ये जवाहरलाल शिक्षण प्रसारक मंडळ, वाखरीचे भाई सुभाष महादेव सोनवणे-आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक ऑल्मपिक वीर श्री विठ्ठल गोविंद करंडे व दै.पंढरी संचारचे कार्यकारी संपादक अनिरूध्द बाळासाहेब बडवे यांना ह.भ.प.प्रसाद महाराज अंमळनेरकर, पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारतनाना भालके, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सामाजिक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच सामाजिक ऋणानुबंध पुरस्कार- चंदाताई तिवाडी (भारूड), रवि सोनार (कवि), यशराज कल्याणराव काळे (नॅशनल स्केटींग खेळाडू), डि.राज सर्वगोड (सामाजिक क्षेत्र), सौ.रेखा टाक, नवजीवन अपंग शाळा, गणेश रूग्णसेवा निवासी मुकबधीर विद्यालय, यशश्री महिला बचत गट गादेगावं, कल्पना चावला महिला बचत गट करकंब, स्वामी समर्थ महिला बचत गट पंढरपूर, जिजामाता महिला बचत गट पंढरपूर, मायाक्का देवी बचत गट पंढरपूर, शिवराम प्रतिष्ठान सोलापूर व चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडणाऱ्या भाविकांना जीवनदान देणारे सुनिल कोताळकर व आप्पा करकमकर यांना सामाजिक ऋणानुबंध हे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. चला हवा येवू द्या फेम योगेश शिरसट व कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम प्राजक्ता हनमघर या कलाकारांचा विनोदी कार्यक्रम पार पडला व प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास संतोषभाऊ नेहतराव, बाळासाहेब नेहतराव, सुरेशभाऊ नेहतराव, अमोल नागटिळक, माजी उपनगराध्यक्ष राहुल साबळे, नगरसेवक महादेव भालेराव, पुंडलिक देवस्थान कमिटीचे दत्ता कांबळे, शशिकांत माने, परशुराम माने, श्रीकांत शिंदे आदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण माने, ज्ञानेश्वर नेहतराव, गणेश कांबळे, सुरज कांबळे, विक्रम टिंगळे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *