👁 8 Views

पंढरपूर-मोहोळ मार्गावर अपघात; मिथिलेश दोशी यांचा मृत्यू

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018


पंढरपूर : पंढरपूर – मोहोळ मार्गावर देगाव ( ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे स्विफ्ट डिझायरला धडकल्याने अल्टो मध्ये असलेल्या मिथिलेश मयूर दोशी यांचा जागीच मृत्यू झाला असून समवेत असलेले शिवा भाऊलाल भोई हे जखमी झाले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, पंढरपूर – मोहोळ मार्गावर स्विफ्ट डिझायर ( क्र. एम. एच. ४४ जी. ३२३२) ही गाडी पंढरपूर नजीक देगाव हद्दीत थांबली होती. स्विफ्ट डिझायर या गाडीचा व अल्टो ( क्र.एम. एच. ४२ एच. ८११४) या गाडीचा अपघात झाला. ऍड. मिथिलेश दोशी हे अल्टो चालवत असल्याचे समजते आहे. या भीषण अपघातात मिथिलेश दोशी जागीच ठार झाले असून त्यांच्यासोबत अल्टोमध्ये असलेले शिवा भोई हे गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट डिझायरमध्ये असलेल्या तानाजी तुळशीराम भांडे (वय ५०, रा. आनंदवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर), व्यंकट विठ्ठल पवार (वय ४० रा. लातूर), अमर अर्जुन भोसले ( वय ३१, रा. लातूर), चंद्रकला भोसले हे जखमी झाले आहेत. जखमींना जनकल्याण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी हवालदार क्षीरसागर, पोलीस नाईक प्रकाश कोष्टी, पोलीस कॉन्स्टेबल इंगोले यांना रवाना केले होते. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *