👁 9 Views

माथाडी बोर्ड वाचवण्यासाठी सज्ज रहा – शिवाजी शिंदे

पंढरपूर LIVE 3 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रराज्य हमाल मापाडी महामंडळ डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी बोर्डाला 50 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात सुर्वण मोहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. डॉ. बाबा आढाव यांनी 27 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दौरा सुरू केला आहे. धुळ्यापासून सुरू झालेल्या या दौर्‍यास संपूर्ण केंद्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सुवर्णमोहोत्सवी वर्षात आपल्या माथाडी बोर्डाला कुणाचाही हात लागला नाही पाहिजे व माथाडी बोर्ड वाचविण्यासाठी सज्ज राहण्याचे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटनीस तथा सोलापूर जिल्हाअध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले आहे. ते सोलापूर मार्केट कमिटी येथे आयोजीत हमाल, तोलार कामगार मेळाव्या प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवानंद पुजारी हे होते. 

यावेळी पुढे बोलताना शिवाजी शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र सकरकार हे बाबाच्या कष्टातून उभारलेल्या महाराष्ट्रातील 36 महामंडळे मोडीत काढून त्यांचे 1 महामंडळ तयार करण्याचा सरकारचा जो डाव आहे तो तुम्ही आम्ही हाणून पाडायचा आहे. डॉ. बाबा आढाव यांनी आपले उभे आयुष्य हमाल माथाडी कामगारांसाठी वेचले आहे. सुवर्ण मोहत्सवी वर्ष चालू असतानाच हे सरकार माथाडी बोर्ड मोडीत काढीत आहे. उलट सरकारने या माथाडी बोर्डास मदत करावी. त्यामध्ये अनेक कामगारांच्या भरत्या कराव्यात व प्रत्येक माथाडी बोर्डास चेअरमनची निवड करावी ही अपेक्षा असताना सरकार मात्र हे माथाडी बोर्ड मोडीत काढीत आहे. कामगारांच्या कष्टातून शासनाचा एक पैसाही या मध्ये नसताना हे माथाडी बोर्ड कामगारांच्या लेव्हीवर चालत आहे. म्हणून सरकारने या माथाडी बोर्डास मदत करावी असे आवाहन शिवाजी शिंदे यांनी केले आहे. 

आज महाराष्ट्रात अनेक संघटना निघत आहेत. काही संघटना मुद्दामहून हमाल पंचायतच्या कामगारांना वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांपासून सर्व कामगारांनी दूर राहून डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली हमाल पंचायतमध्येच राहण्याचे आवाहन केले आहे. आज सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आनेक कामगार वेगवेगळ्या आडत्याकडे काम करीत आहेत. त्यांचा पगार माथाडी बोर्डाकडे भरला जात नाही. म्हणून जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती व माथाडी बोर्डास निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक कामगारांनी आपला पगार हा माथाडी बोर्डातच भरला पाहिजे तरच आपल्या भविष्यातील सुखसोई मिळतील असेही शिंदे यांनी सांगितले आहे. 
यावेळी सोलापूर जिल्हा हमाल पंचायतचे उपाध्यक्ष पांडुरंग सांबळे, संचालक शिवानंद पुजारी, गपुर चांदा,  सिधु हिपरगी, हाऊशेटी शेळगीकर, गुरू पुराणीक, जावेद शेख, शिवलिंग शिवपुरे,  भिमा सिताफळे, दत्ता मुरूमकर, अंकुश मडखंबे, राजू काळजे, ताईबाई मुळे, मैनाबाई डावरे,  सुनिता रोटे, शारदाबाई बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने माथाडी कामगार  उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *