👁 8 Views

जिल्ह्यातुन तडीपार केलेल्या पंढरपूर तालुक्यातील गुन्हेगारास मोहोळ परिसरात अटक… कायद्याचा भंग करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार- पोलीस निरीक्षक धनंजय जाधव

पंढरपूर LIVE 23 नोव्हेंबर 2018 

 पंढरपूर तालुक्यातील एका गुन्हेगारास सोलापूर जिल्ह्यातुन तडीपार केलेले असताना सदर गुन्हेगार सोलापूर जिल्हा हद्दीत वावरत होता. ही माहिती पंढरपूर तालुका पोलीसांना समजताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने या गुन्हेगाराला अटक करून ताब्यात घेण्यासाठी हालचाली केल्या. अशाप्रकारे जर कोणी गुन्हेगार कायदा सोडताना आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. अशी माहिती धनंजय जाधव यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना दिली आहे.

पंढरपुर तालुका पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार सुरज मनोहर जगताप रा.जगदंबा नगर, लक्ष्मी टाकळी ता पंढरपुर याचेवर पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस विविध प्रकारचे गुन्हे दाखल असुन, त्या गुन्हयामध्ये  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 56 प्रमाणे पाठवलेल्या प्रस्तावास उपविभागीय दंडाधिकारी सो पंढरपुर विभाग यांनी मंजुरी देवुन सुरज मनोहर जगताप यास एक वर्षाकरिता सोलापुर जिल्ह्यांतून हदद्पार केले होते.


सुरज मनोहर जगताप याचे हदद्पारीचे आदेश झाले असताना व त्याला जिल्हयाचे बाहेर काढलेले असताना सुध्दा त्याने सोलापुर जिल्हयामध्ये प्रवेश करून मा.उपविभागीय दंडाधिकारी सो पंढरपुर यांचे आदेशाचा भंग केला. त्याबाबची माहिती पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांना मिळालेवरून त्यांनी मोहोळ पोलीस ठाणे यांना सदर माहिती दिलेवरून   मोहोळ पोलीस ठाणे चे पीआय कोकणे यांनी सुरज मनोहर जगताप यास मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतुन ताब्यात घेवुन त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे कारवाई करण्याचे कामकाज चालु आहे. सदर गुन्हा सिद्ध झालेस 06 महिन्यापासुन ते 02 वर्षाकरिता कारावासाची शिक्षा आहे. 

यापुढे ज्या गुन्हेगारावर 02 किंवा 02 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत असे सर्व गुन्हेगार जिल्ह्याचे बाहेर हदद्पार केले जाणार असुन, त्या कालावधीत त्यांचेवर कडक निगराणी ठेवली जाणार असुन, असे कोणत्याही  गुन्हेगाराने जिल्हयातुन हदद्पार केलेनंतर उपविभागीय दंडाधिकारी सो यांचे आदेषाचा भंग करून सोलापुर जिल्हयात प्रवेश केला तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 प्रमाणे त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

02 किंवा 02 पेक्षा जास्त गुन्हे असणा-या कोणत्याही गुन्हेगाराची हयगय केली जाणार नाही, त्यांचा कोणताही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. असा इशारा पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव सो यांनी दिलेला आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *