👁 6 Views

विविध मागण्याबाबत १८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचा मंत्रालयावर महामोर्चा … 1 जानेवारीपासुन राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

पंढरपूर LIVE 27 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचायांना ७ वा वेतन आयोग लागु करावा व इतर विविध मागण्याबाबत दि.१ जानेवारी २०१९ पासुनराज्यातील सर्व नगरपरिषदा बेमुदत काम बंद आंदोलन करणार व नविन नगरपंचायत कर्मचा-यांचा विना शर्त विना अट समावेशन करण्याबाबत. दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी मंत्रालयावर महामोर्चा.  
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीची वतीने जे पी नाईक भवन, पुणे येथे संवर्ग/कंत्राटी/रोजंदारी/सफाई/कायम नगरपरिषद व नवीन नगरपंचायत मधील कर्मचायाच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय संघटना पदाधिकायाची बैठक राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एलकराड यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे जनरल सेक्रटरी सुनिल वाळुजकरपुणे विभागाचे अध्यक्ष प्रा..बी.पाटीलकार्याध्यक्ष धंनजय पळसुले, कॉ.एम.एच.शेख, रामदास पगारे, पोपटराव सोनवणे, प्रकाश जाधव, कॉ.सिद्धाप्पा कलशेट्टी, किरणताई मोघे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झालीया झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव व संचालक  नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याशी चर्चा होवुन सुद्धा शासनाने नगरपरिषद कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागु न केल्याने व इतर झालेल्या निर्णयावर आदेश परिपत्रक न काढल्याने दि.१ जानेवारी २०१९ पासुन महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल कराड व जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी जाहिर केले. शासनाने ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये नव्याने केलेले आहेत. या नगरपंचायती मधील कर्मचारी, सफाई कर्मचारी, रोजंदारी, कंत्राटी कामगार यांचे विना शर्त विना अट समावेशन करावे या मागणीसाठी दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी मंत्रालयावर राज्यव्यापी महामोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.      

यावेळी बोलताना डॉ.डी.एल.कराड यांनी सांगितले कीनगरपरिषद कर्मचायाच्या वावेतन आयोग लागु करणे,रोजंदारी, कंत्राटी कामगार यांना कायम करणे  उच्चन्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाची अंमलबजावणी करणे, २७ मार्च२००० पर्यंत रोजंदारी कर्मचायानां कायम करणेनगरपरिषद कर्मचायाना २४ वर्ष कालपद्ध पदोन्नती लागु करणे,  नवीन नगर परिषदनगर पंचायत मधील कायम  कर्मचारीसफाई कर्मचारी यांचे समावेश चा प्रश्नासाठी  आंदोलन केल्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,नगरविकास मंत्री डॉ.रणजित पाटील,  नगरविकास सचिव मनिषा म्हैसकरमा.आयुक्ततथा संचालक विरेद्रसिंह यांचेशी चर्चा झाली पण आश्वासना शिवाय काही मिळाले नाहीशासनाने  संघटनेची फसवणूक केली आहे. तरी आपल्या ला आंदोलन करण्या शिवाय पर्यायनाहीत्यामुळे येत्या दि.१ जानेवारी २०१ पासुन बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच नव्याने स्थापन झालेल्या   नगरपंचायतीच्या कर्मचा-यांचे विना अट विना शर्त समावेशन करावे या मागणीसाठी दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी महाराष्ट्रातील सर्व नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायत कर्मचा-यांच्या महामोर्चा मंत्रालयावर काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये  महाराष्ट्रातील १० हजार कर्मचारीसामिल होणार आहेततसेच दिनांक  डिसेंबर २०१८ ते १० डिसेंबर २०१८ या कालावधीतमहाराष्ट्रातील कर्मचायाच्या मागण्याच्या निवेदनावर नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी सह्याकरुन पालक मंत्रीआमदारखासदार यांना निवेदन देऊन कर्मचायाच्या मागण्याकडे लक्ष वेधतील. तसेच बेमुदत काम बंद आंदोलन यशस्वी होण्याच्या दृष्टीने दि.९ डिसेंबर २०१८ रोजी उत्तर महाराष्ट्राचा महा मेळावा नाशिक येथे होईल 

    

तसेच २२ डिसेंबर २०१८ रोजी मंगळवेढा जि.सोलापूर येथे पश्चिम महाराष्ट्राचा महामेळावा घेण्यात येणार आहे. तसेच मराठवाडा,कोकण विदर्भ येथेही महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ.डी.एल.कराड व राज्याचे जनरल सेक्रटरी सुनिल वाळुजकर यांनीदिली. पुणे येथे झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे कामगार नेते यावेळी कॉ.सिध्दाप्पा कलशेट्टीप्रा.बी.जी.खाडे सर, अरुण घुंडरे, कॉ.रामराजे महाडीक, राजेंद्र शिंदे, प्रमोद हडप, दत्तात्रय कुर्डे, पंजाबराव गायकवाड, एकनाथ गायकवाड, मधुकर मोकळे, अंकुशराव बुधवंत, व राज्यातील सोलापूर, जालना, पुणे, सटाणा, मनमाड, परभणी, निफाड, दिंडोरी, हिंगणघाट, नगर, बीड, इचलकरंजी, शिरुर, बुलढाणा, कोल्हापुर, सातारा, उस्मनाबाद जिल्ह्यातील कामगार संघटनेचेपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते   

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *