👁 5 Views

तावशी जि.प.शाळेतील रिक्त जागी शिक्षक भर्तीसाठी संभाजी ब्रिगेड ठिय्या आंदोलन करणार

पंढरपूर LIVE 27 नोव्हेंबर 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील मौजे.तावशी येथील जि.प.प्रा.शाळेतील रिक्त जागी शिक्षक भर्ती करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संभाजी ब्रि गेडचे सोलापूर जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
 

गेल्या वर्षी सप्टेंबर2017 मध्ये शाळेचा पट 122 होता. सदर शाळेत गेल्या वर्षापर्यंत ‘30 विध्यार्थ्यांना एक शिक्षक’ याप्रमाणे पाच शिक्षकांची  नियक्ती होती. परंतु गेल्या वर्षी एका शिक्षकाची जागा रिक्त झाली असुन सध्याचा शाळेचा पट गेल्यावर्षी पेक्षा जास्त म्हणजेच 128 असताना चालू सन-2018-19 नुसार सदर  जि.प.शाळेला 5 शिक्षक मंजूर व एक जागा रिक्त असताना, सध्या चारच शिक्षक कार्यरत आहेत.त्या शिक्षकाचा भार या चार शिक्षकांवर पडत आहे. एक तर शासनाकडुन शिक्षकांना मतदार नाव- नोंदणी व इतर शाळाबाह्य कामे नियमितपणे दिली जातात व शाळेची गुणवत्ता, क्रीडाप्रकार, सांस्कृतीक कार्यक्रम, शालेय पोषण-आहार व सर्व प्रकारचा जमा-खर्च अहवाल लिखित स्वरुपात ठेवन्याची आपणच अपेक्षा करतो. त्यामूळे शिक्षकांवरील वाढत्या कामाचा भार कमी व्हावा व शाळेची गुणवत्ता वाढावी म्हणुन जि.प.प्रा.शाळा तावशी येथील रिक्त जागेवरील शिक्षकाची पटसंख्येच्या प्रमाणात नेमणुक त्वरित करावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

    

ही मागणी मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालय पंढरपूर समोर गुरुवार दि.29/11/2018 रोजी स.11.00 ते 05.00 वा.पर्यंत एक दिवसीय ठिय्या  आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व संभाजी ब्रिगेड सोलापुर जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे यांनी सदर निवेदनाच्या प्रती मुख्य.कार्यकारी अधिकारी व प्रा.शिक्षणाधिकारी जि.प.सोलापुर, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पं.स.पंढरपूर, तहसिलदार पंढरपूर व शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे,  तालूका अध्यक्ष बाळासो बागल, शहराध्यक्ष स्वागत  कदम, अध्यक्ष अमोल कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल यादव व फिरोज तांबोळी उपस्थित होते़.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *