पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली असून यामध्ये महाद्वार घाटावर गोपुर बाधणे, गोपाळपूर रोडवर दर्शन हॉल बांधणे, इसबावी भागाचा सुधारित विकास आराखडा तयार करणे व वडार समाजाच्या पुर्वी दिलेल्या जागेवर सांस्कृतीक हॉल बांधण्याच्या विषयांना मंजुरी देण्यासोबतच अन्य कांही महत्वपुर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली.
या सभेत आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी आरोग्य विभागाला आपल्या कामात तातडीने सुधारणा करण्याची सुचना केली. चेन्नईतील जय हनुमान सेवा ट्रस्टच्या प्रस्तावावर श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस गोपाळपूर रोड येथे दर्शन हॉल बांधणे, आरोग्य व्यवस्थाकर आणि पार्किंग फी वसुलीची रक्कम निश्चित करुन निविदा काढणे, शहरातील भुयारी गटारांमधील मेन होल चेंबरमधील गाळ काढण्यासाठी डी सील्ट मॅन वाहन खरेदी करणे, नवीन भक्त निवास समोरील जागा विकसीत करण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करणे, शहरातील वाहतूक आराखडा तयार करणे, शहरातील यमाई तलावापासून जलशुध्दीकरण केंद्राकडे पाण्याचा पाईप टाकून पाणी नेण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करणे आदी महत्वपुर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली.
मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने राजाभाऊ सरवदे यांचा अभिनंदनाचा ठरावही या सभेत मंजुर करण्यात आला.
गटनेते अनिल अभंगराव यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याची सुचना केली तर पक्षनेते संग्राम अभ्यंकर यांनी मंदिर समितीशी समन्वय साधण्यासाठी नगरसेवकांची एक समिती बनविण्याची सुचना केली.
आहे त्याच जाग्यावर वडार समाजाचे सांस्कृतीक हॉल
वडार समाजासाठी पुर्वी देण्यात आलेल्या जागेवरच सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठीचा विषय यावेळी मंजुर करण्यात आला. यासंबंधी माजी नगराध्यक्ष नगरसेवक दगडू धोत्रे व वामन बंदपट्टे यांनी सुचना केली होती.
या सभेतील चर्चेत नगरसेवक सुधीर धोत्रे, महादेव भालेराव, सुजितकुमार सर्वगोड, शकुंतला नडगिरे, श्वेता डोंबे आदींनी सहभाग घेतला. उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी प्रभारी मुख्याधिकारी म्हनून काम पाहिले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








