👁 6 Views

खर्डी येथे श्रीसिताराम महाराज भंडारा भक्तीमय वातावरणात साजरा

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018


खर्डी प्रतिनिधी संतोष कांबळे
पंढरपूर तालुक्यातील श्रीसिताराम महाराज समाधी मंदिर, खर्डी येथे गेल्या सात दिवसापासून सुरु असलेल्या नामसप्ताहाचा सांगता समारंभ ह.भ.प. रामदास महाराज रोंगे यांच्या कीर्तनाने करण्यात आला. यावेळी बापू केसकर, सिताराम महाराजांचे पुजारी व उपरी भजनी मंडळ तसेच बोहाळी व इतर गावातील भजनी मंडळींनी श्रीचरणी आपली सेवा अर्पण केली.

 नामसप्ताह कालावधीत येणार्‍या भाविकांना दररोज मिष्टान्न भोजनाची सोय गावातील नागरिकांनी व ट्रस्टच्या वतीने करण्यात आली होती. दरवर्षी पंचवीस ते तीस हजार भाविक वेगवेगळ्या जिल्ह्यातून व प्रांतातून महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने विशेष काळजी घेतली होती. खर्डी ग्रामपंचायतीने स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला होता. तसेच पाणी, लाईट, मोबाईल टॉयलेट, तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा कालावधीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंढरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अहोरात्र आपली ड्युटी बजावत होते.

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस अधीक्षक धनंजय जाधव यांनी यात्रा कालावधीत सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवले होते व दररोज खर्डी येथे बंदोबस्ताला ते दररोज स्वतः हजर राहत होते. यात्रा कालावधीत पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल सरपंच रमेश हाके यांनी विशेष आभार मानले. यावेळी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांत परिचारक, आमदार भारतनाना भालके युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेशराव परिचारक व जिल्ह्यातील वेगवेगळ्या नेत्यांनी श्रीसीताराम महाराजांच्या दर्शनासाठी खर्डी येथे हजेरी लावली होती. यात्रा व्यवस्थित पार पाडण्यामध्ये खर्डीतील सर्व नागरिकांचे व तरुणांचे सहकार्य लाभले.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *