👁 9 Views

परळी तालुक्यातील हेळंब येथे श्रीखंडोबाच्या यात्रेची जय्यत तयारी… _13 ते 15 डिसेंबर दरम्यान भरणार यात्रा

पंढरपूर LIVE 7 डिसेंबर 2018

यळकोट यळकोट घे ! बोरणच्या राजाची आगमनाची व यात्रोत्सवाची तयारी सुरू 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –  
           तालुक्यातील मौजे हेळंबच्या श्री खंडोबाची यात्रा दि.13 ते 15 डिसेंबर 2018  दरम्यान होणार आहे. यात्रेची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. यळकोट यळकोट घे ! सदानंद यळकोट घे घे ! बोरणच्या राजा येळकोट येळकोट घे ! शिवमल्हारीचा यळकोट घे ! माळसाकांत मल्हारी मातृंडाचा यळकोट घे च्या जयघोषात यात्रा भरते या ठिकाणी दरवर्षी यात्रेला  मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर हेळंब येथे घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. दररविवारी ही या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी असते.
           

हेळंब येथुन जवळच असलेल्या बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. स्वतः  खंडोबा हे हेळंब येथे वास्तव्याला होते. त्याचा पुरावा म्हणुन स्नान साठी वापरण्यात येते असलेल्या तीर्थ कुंड आजही उपलब्ध आहे. घोडा बांधन्यासाठी खुट उपलब्ध आहे. व त्याच्या खुना आजतागयत आहेत. श्री खंडोबा मंदिराची दुर दुर ख्याती आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला इथे मोठी यात्रा भरते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. दरवर्षी लाखौं भाविक दर्शन घेतात. यात्रा जवळ आली असुन यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. बेल भंडार्याची उधळण भाविक करतात. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावोगावचे नागरिक दर्शनासाठी, नवस करण्यासाठी व नवसाच्या पुर्तेतेसाठी येथे गर्दी करीत असतात. या पार्श्‍वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छतेसह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रे निमित्त गावामध्ये दि.13 ते 15 डिसेंबर या कालावधीत श्रींची पालखी मिरवणुक, शोभेची दारु, वाघ्या मुरळी आदींसह कुस्त्या व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. तसेच श्री खंडोबाचे मंदिरच्या विकासासाठी व भक्तांच्या सोयीसुविधेसाठी शिवाजी गुट्टे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंञी ना.पंकजाताई मुंडे व बीडच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आपल्या आमदार व खासदार फंडातून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मंदिराच्या विकासासाठी चालना मिळाली आहे. व श्री हनुमान मंदिर जिणोध्दाराचे प्रगतीपथावर आहे. 
         

    

श्री खंडोबाचे मंदिर हे हेळंब गावापासून पासुन 1 किलोमिटरावर बोरणा नदीकाठी असुन रस्त्याची डागडुजी व सुशोभिकरण करण्यासाठी नागरिक सरसावले आहेत. श्रींच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात येत असुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गावातील खंडोबाच्या निवासस्थापासून श्री खंडोबाची मुर्ती पालखी मध्ये स्थिरावते व ती पालखी गावातील मुख्य रस्त्यावरून गाव प्रदक्षिणा घालून गावापासून वाजतगाजत वाघ्यामुरळीच्या ताफ्यासह खोबर भंडारा उधळीत पंचक्रोशीतील भक्तगणासह ही पालखी बोरणच्या राजाकडे दुपारी दोन वाजता निघते व चार वाजता पोहचंते व तिथील बोरणच्या राजाचा श्री खंडोबा मंदिरात ती पालखी स्थिरावते व खोबर भडारा उधळून यळकोट यळकोटच्या जय घोषात उत्सव साजरा करतात. नंतर मंदिराच्या वरील भव्य प्रांगणात बाहेरील आलेल्या भक्तगणाचा सत्कार करण्यात येतो. नंतर पालखी वाजत गाजत संध्याकाळी हेळंब नगरीमध्ये येते. व शोभेचे दारू उडवली जाते.  गावातील युवक व खंडोबा भक्त यात्रेच्या तयारीला लागले आहेत. घरोघरी मोहरवासिनी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या स्वागताचीही तयारी सुरु आहे. 

कामा निमित्त बाहेर गावी गेलेले नागरिकही यात्रेनिमित्त आवर्जुन गावाकडे येतात. दरम्यान पंचक्रोशीतुन मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रेची तयारी सुरू असुन यात्रोत्सव काळात लागणार्‍या सुविधा व येणार्‍या भाविकभक्तांची सोय करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत व गावकरी तयारी करत असल्याचे ज्येष्ठ नेते मधुसूदन होळंबे, चेअरमन महादेव होळंबे, पोलिस पाटील सुंदराव आंधळे, गणपतराव आंधळे, बालाजी आंधळे, ब्रम्हमाचारी नवनाथ महाराज आंधळे, मृदंगाचार्य प्रल्हाद आंधळे, इंद्रजित होळंबे, बालाजी होळंबे गुरुजी, भास्कर आंधळे गुरुजी, ज्ञानोबा आंधळे, बब्रवान होळंबे गुरुजी, ह.भ.प.वैजनाथ महाराज शिंदे, व्यकंटी होळंबे, पाटील पाळवदे गुरुजी, मनोहर पाळवदे, परमेश्वर पाळवदे,  पपन होळंबे,व सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई अशोकराव होळंबे व उपसरपंच सौ.लक्ष्मीबाई राम पाळवदे व ग्रामपंचायत सदस्य सौ.मंदोदरी सुधाकर होळंबे, सौ.द्वारकाबाई विश्वनाथ आंधळे, वैजनाथ भानुदास आंधळे ,दत्तू वामन लांडगे, सौ.बबिता परमेश्वर होळंबे,दत्ता मुंजा पाळवदे, सौ.भारतबाई भानुदास पाळवदे, वैजनाथ होळंबे व ग्रामस्थांनी सांगितले आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *