👁 9 Views

सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांचा जाहीर सत्कार

पंढरपूर LIVE 18 डिसेंबर 2018

(सांगोला प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ शनिवार 15 डिसेंबर 2018 रोजी सांगोला दौऱ्यावर आले असता सांगोला तालुका व शहर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे नेते आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ  यांचा फुले पगडी व पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.  यावेळी सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पादाधिकारी यांना मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत सत्ता संपादन करण्यासाठी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. भाजपने केलेला विकास इतका पळाला की चार वर्षे शोधून देखील सापडला नाही. मराठा-मुस्लिम, सवर्ण-दलित अशी भांडणे लावून मताची बेगमी करणारे भाजप सरकार आता देवाला देखील मोकळे सोडत नाहीत. 
    
     भीषण दुष्काळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांना मदत करण्याचे धारिष्ट्य या सरकारने दाखवले नाही. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गोरगरिबांना व शेतकऱ्यांना मदत न केल्याचा परिणाम पाच राज्यातील  निवडणुकीत भाजपला भोगावा लागला आहे. सध्या महागाईने उच्चांक गाठला असून वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. 
     येणाऱ्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांचे विचार घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करावी असे सांगत निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. 


 यावेळी आमदार सिद्धराम म्हेत्रे,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ट नेते बाबूराव गाईकवाड,माजी जि.प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड प्रदेश सरचिटणीस जयंत भंडारे, रंजन गिरमे जि.स.उमेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार, उपसभापती शोभाताई खटकाळे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, बाबुराव गायकवाड, नगरसेविका सुनिता खडतरे, भामाबाई जाधव, अनुराधा खडतरे, नगरसेवक सचिन लोखंडे, सतीश सावंत जुबेर मुजावर, महिला आघाडीच्या अध्यक्षा सखुताई वाघमारे, शहराध्यक्षा शशिकला खाडे, ऍड. बनकर, ऍड. संपतराव पाटील, विजयकुमार कांबळे, नाथा जाधव, विनायक मिसाळ, नंदकुमार दिघे, डॉ. धनंजय पवार, आलमगीर मुल्ला, युवक शहराध्यक्ष प्रताप मस्के, रामचंद्र मिसाळ, अरुणभाऊ घुले, चंद्रकांत करांडे तानाजी कांबळे, विठ्ठल बागल, शहाजी हातेकर, विजय पवार  यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज उकळे व सुभाष लऊळकर यांनी केले

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *