पंढरपूर LIVE 30 डिसेंबर 2018
कुटुंबातील महिला व मुलासह चळे येथील
एका कुटूंबाचे तहसिल कार्यालयात आंदोलन
अतिक्रमण झालेला वहिवाटीचा सरकारी रस्ता खुला करण्याची मागणी!
पंढरपूर :-पंढरपूर तालुक्यातील चळे येथील एका कुटुंबातील महिला व लहान मुलासह एक संपुर्ण कुटुंबच गेल्या तीन दिवसापासुन पंढरपुर येथील तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडुन बसलेले आहे. कुडकुडणार्या थंडीत तीन दिवसापासुन चालेल्या या कुटुंबाला मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही.
चळे-तारापूर रस्ता हा सरकारी रस्ता असून अनेक दिवसापासून वहीवाटीस खुला होता; परंतु या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने हा सरकारी रस्ता बंद झाला आहे. हा रस्ता गटनंबर 271 मधील असून रस्ता खुला करण्यासाठी शुक्रवार 28- 12 -18 रोजी सुरेश शंकर कुंभार, रमेश वसंत कुंभार ,राहुल वसंत कुंभार, चिरंजीव रंजीत राहुल कुंभार (वय तीन वर्षे) सुभद्रा वासुदेव कुंभार, राणी सुरेश कुंभार, रेश्मा रमेश कुंभार, स्वाती उत्तम कुंभार हे सहकुटुंब पंढरपूर तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या दालनात आंदोलन सुरू केले आहे. हाच रस्ता खुला करण्यासाठी या अगोदर कुंभार कुटुंबाने उपोषण केले होते. रस्ता खुला करून देतो असे सांगत प्रांत व तहसीलदार यांनी उपोषण सोडायला भाग पाडले. परंतु यानंतरही रस्ता खुला होत नसल्याने कोणत्याही वेळी आत्मदहन करू असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र न्यायालयाने रस्ता खुला करण्याबाबत निर्णय देवूनही तहसीलदार रस्ता खुला करण्यास टाळाटाळ करत असल्याने न्याय मिळेपर्यंत आम्ही तहसीलदार यांचे दालनात गेल्या तीन दिवसापासून ठीय्या आंदोलन सुरू केले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






