👁 7 Views

सरत्या वर्षाला रक्तदानाने निरोप… रक्तदान झाल्यावर हेल्मेट भेट ः एनआयटी मित्र परिवाराचा उपक्रम… ५०० हुन अधिक रक्दात्याचे रक्तदान

पंढरपूर LIVE २ जानेवारी २०१९


नविन वर्षाचे स्वागत हे जल्लोष आणि फटाक्यांची आताषबाजी करून तरूणाईकडून केले जाते. परंतु पंढरपूरात गेल्या पंधरा वर्षापासून एनआयटी परिवाराच्या तरुणांकडून सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत हे रक्तदानाने होत आहे. याच आजच्या रक्तदान शिबीरामधे सुमारे ५०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यंदा एनआयटी परिवारांकडून रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले. त्यामुळे  रक्तदानासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. 

  थर्टी फस्ट नाईट रोजी तरूणाई ही बेंधुंद होउन मद्यप्रशन करून नविन वर्षाचे स्वागत करीत असते. तर काही तरूण मित्रांच्या शेतात, तसेच घरांमधे , हॉटेल्सच्या माध्यमातून पाटर्याचे आयोजन करतात. मात्र या सर्वामधे पंढरीत गेल्या पंधरा वर्षापासून एनआयटी मित्र परिवाराकडून नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर आणि शाम गोगांव हे रक्तदान शिबीरांचे आयेाजन करतात. 

   या  शिबीराचे सोमवारी आज सकाळी  आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी  मर्चण्ट बॅकेचे चेअरमन नागेश भोसले , मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे , पंडीत भोसले , कांतीनाथ डुबल , नगरसेवक विवेक परदेशी , माजी नगरसेवक सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबीरामधे रक्तदान करणा-या रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले. सध्य जिल्हयात हेल्मेट सक्तीचे लोण आहे. या पार्श्वभूमीवर एनआयटी परिवरांकडून हेल्मेट भेटची संकल्पना स्तुत्य मानली जात आहे. 
विशेष म्हणजे आज रक्तदान शिबीरांच्या प्ररंभी पंढरपूरातील शतकवीर रक्तदाते भजनदास लेंगरे , रविंद्र भिंगे , शशिकांत दुनाखे यांचा सन्मान करण्यात आले. तर ५० वेळा रक्तदान करणा-या बिपीन कुलकर्णी यांचा देखिल  विशेष सन्मान करण्यात आला. 

एनआयटी परिवार गेल्या पंधरा वर्षापासून ३१ डिंसेबर रोजीच रक्तदान शिबीराचे आयोजन करते. यांचे कारण असे की , रक्तदान झाल्यावर रक्तदात्याला पुढील २४ ते ४८ तास मांस व मद्य सेवन करण्यासंबधीचा निर्बेध्द हा वैद्य्क शास्त्रात आहे. हयांच शास्त्रीय कारणांच्या आधारावर या रक्तदान शिबीरांचे संकल्पना पुढे आली. आणि आज पंधरा वर्षापर्यत अविरत सुरू आहे. 

सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर , शाम गोगांव यांसह महेंद्र जोशी , बाहुबली गांधी , समीरन ताठे, सिध्देश्वर कोरे, महेश म्हैत्रे ,दत्ता पवार ,  विजय तथा बंटी वाघ , दत्ता पवार,  गणेश पिंपळनेरकर , गणेश जाधव ,ईश्वर शिंदे , आबा सावंत , प्रणव पुजारी आदिंनी परिश्रम घेतले आहे. 

 – 
रक्तदानासाठी रांगाच रांगा.. 
   पंढरीत आज झालेल्या रक्तदान शिबीरासाठी येथील स्टेशन रोडच्या जेठाभाई धर्मशाळेमधे रांगाच रांगा लागल्य होत्या. यामधे दिवसभरात सुमारे ५०० हून अधिक रक्तदात्यांनी रांगाच रांगा लावून रक्तदान केले. विशेष म्हणजे ५०० हून अधिक रक्तदात्यांना एनआयटी परिवरांकडून हेल्मेट भेट देण्यात आले. 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *