पंढरपूर LIVE १ जानेवारी २०१९
महाराष्ट्र शासनाने राज्य शासन कर्मचा-यांना ७वा वेतन आयोग देण्याची घोषणा केली. तथापि नगरपरिषद, नगरपंचायतीमधील कर्मचा-यांना ७वा वेतन आयोग लागु करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा न केल्याने महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग व सफाई कर्मचा-यांच्या विविध मागण्यांबाबत राज्यातील सर्व कामगार संघटनेच्या संघर्ष समितीमार्फत बेमुदत काम बंद आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु करण्यात आले आहे.
या पुर्वी मा.मुख्यमंत्री, मा.नगरविकास सचिव, मा.संचालक न.प.प्र.स. यांच्याशी चर्चा करुनही कर्मचा-यांच्या मागण्या बाबतचा निर्णय व आदेश निघाले नाहीत. त्यामुळे नगरपालिका नगरपंचायत संर्घष समितीच्यावतीने मा.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आलेल्या होत्या. परंतु मागण्या मान्य करुन कार्यवाही न झाल्याने १ जानेवारी २०१९ पासुन राज्यातील ३५९ नगरपालिका बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची नोटीस यापुर्वी शासनाला बजावण्यात आलेली होती. परंतु शासनाने याची दखल न घेतल्याने नगरपालिका नगरपंचायत कर्मचा-यांना १ जानेवारी २०१६ पासुन ७ वा वेतन आयोगा सोबत इतर मागण्या मान्य कराव्यात म्हणुन पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांनी दि.१ जानेवारी २०१९ बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष कॉ.डी.एल कराड, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर करित आहेत. तसेच पंढरपूर नगरपरिषदेचे कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांचे नेतृत्वाखाली सह.कार्याध्यक्ष शरद वाघमारे, उपाध्यक्ष किशोर खिलारे, जयंत पवार अनिल गोयल, प्रितम येळे, नागनाथ तोडकर, धनंजय वाघमारे, पराग डोंगरे, सुखदेव माने, रवि वाघमारे, दत्तात्रय चंदनशिवे, जिजा शिंदे, शारदाबाई इंगळे, जया वाघेला, लक्ष्मीबाई हुंडेकरी, पोपट जाधव यांनी बेमुदत आंदोलन यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेत आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







