पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2019
संपुर्ण व्हिडीओ क्षणचित्रे…
रविवार दिनांक 6 जानेवारी रोजी पंढरपूर येथील नगर परिषदेच्या पत्रकार भवनामध्ये पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती व महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर यांच्या संयुक्त वतीने पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिन साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणुन पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे आणि नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर आदी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, जेष्ठ पत्रकार अशोक गोडगे, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, पत्रकार लक्ष्मण जाधव, पत्रकार अमोल कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी केले तर आभार पत्रकार सुरक्षा समितीचे पंढरपूर अध्यक्ष रामभाऊ सरवदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.विनया उत्पात यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे, पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे, पंढरपूर नगरपरिषदेची उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. पत्रकारांना सन्मानित करणार्या या कार्यक्रमात पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी, भाऊ तेलंग, प्रकाश पटवर्धन, नंदकुमार देशपांडे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक बा.ना. धांडोरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामभाऊ सरवदे, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष भगवान वानखेडे,पंढरपूर अध्यक्ष वीरेंद्र उत्पात, पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष अपराजित सर्वगोड, अविनाश साळुंखे, शंकरराव कदम, संतोष कांबळे, श्रीकांत कसबे,गौतम जाधव, धीरज साळुंखे, नंदकुमार देशपांडे, जैनुद्दीन मुलाणी, शंकर पवार, बालाजीसिंह परदेशी, विक्रम कदम,श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक हरिदास, यशवंत कुंभार, बाहुबली जैन, अमोल कुलकर्णी, चैतन्य उत्पात, विजयकुमार कांबळे, राधेश बादले पाटील, रामकृष्ण बिडकर, शंकर पवार, दत्ताजी पाटील, विश्वास पाटील, श्रीनिवास उपळकर, संजय यादव, लक्ष्मण जाधव, अमोल गुरव, दादा कदम, राजेंद्र कोरके पाटील, कुमार कोरे आदींसह अनेक पत्रकार बंधु उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







