पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2019
जुन्नर – शिवनेर प्रतिष्ठान ऐरोली संचलित राजाराम पाटील वृद्धाश्रम, पांगरीमाथा, बल्लाळवाडी येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्य़ात आला. यानिमित्ताने पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन सुफी संत पीर कबीर साहेब उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुफी संत पीर कबीर म्हणाले की, वृद्धाश्रमातील वृद्ध आणि अनाथ मुले हे खर्या अर्थाने समजातील वंचित घटक आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. तसेच यानिमित्तानं शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक व महाराष्ट्र पत्रकार संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष प्रा.अशफाक पटेल यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत. आजची परिस्थिती पाहता पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज आहे असे आवाहनही केले. तसेच शिवनेर प्रतिष्ठानने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी प्रतिष्ठानचे आभार मानत प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छाही दिल्या.
यावेळी अरुण पारखे, जितेंद्र बिडवई, अॅड.कुलदिप नलावडे, अॅड.ढमढेरे, आदिनाथ चव्हाण, विवेक तांबोळी, भानुदास कोकणे, राजेंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी पत्रकार दत्ता म्हसकर, मिनानाथ पानसरे, शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक व महाराष्ट्र पत्रकार संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष प्रा.अशफाक पटेल, सुभाष भोर, दामोदर जगदाळे, पवन गाडेकर, प्रा.चौरे सर, राजेश डोके, रुपेश जाधव, लक्ष्मण दातखिळे या पत्रकारांचा मराठी पत्रकार दिनानिमित्त शाल, पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तांबोळी यांनी तर सुत्रसंचालन फकिर आतार सर यांनी केले. या सन्मान सोहळ्याचा समारोप पसायदानाने करण्यात आला.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







