पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2019
मुंबई ( शाहरुख मुलाणी ) – मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा शहराला इतिहासकालीन वस्तू आणि वास्तूंचा गौरवशाली वारसा लाभला आहे. सातारा शहरात ऐतिहासिक छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयासाठी जिल्हा क्रीडा संकुलाशेजारील शासकीय जागेत भव्यदिव्य आणि ऐतिहासिक सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशी भुईकोट (जमीनीवरील गड) प्रकारातील वास्तू उभारण्याचे काम सुरु आहे. या इमारतीच्या दुसर्या टप्प्यातील कामास बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाने तातडीने सुरुवात करावी, अशा सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
पहिल्या टप्प्यात 8 कोटी 37 लाखदुसऱ्या टप्प्यात 5 कोटी 20 लाख 44 हजार 951 रुपयेतिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 50 लाख रुपयेएकूण 16 कोटी 07 लाख 44 हजार 951 रुपये
पहिल्या टप्प्यात 8 कोटी 37 लाखदुसऱ्या टप्प्यात 5 कोटी 20 लाख 44 हजार 951 रुपयेतिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 50 लाख रुपयेएकूण 16 कोटी 07 लाख 44 हजार 951 रुपये
सातारा शहरात छ. शिवाजी संग्रहालय आहे. मात्र या जुन्या इमारतीमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने आणि इमारत तोकडी असल्याने पर्यटकांची गैरसोय होत असते. त्यामुळे संग्रहायलाच्या नवीन इमारतीला मंजूरी आणि निधी मिळवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरवा करुन हे काम सन 2008 मध्ये मंजूर करुन घेतले होते. दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण झाले असून इमारत उभी राहिली पण, पुढील काम निधी अभावी रखडले होते. काम मंजूर झाल्यानंतर संग्रहालयाचे काम तीन टप्प्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पहिल्या टप्प्यातील इमारत उभारणीचे काम पुर्ण झाले आहे. त्यासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेला 8 कोटी 37 लाख निधी खर्च झाला आहे. दरम्यान, दुसर्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी 20 लाख 44 हजार 951 रुपये निधी नोहेंबर 2017 मध्ये मंजूर करुन घेतला होता. हा निधी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून इमारतीच्या आतील फर्निचर, अंतर्गत सजावट यासह संग्रहालय परिसरात बाग बगीचा निर्माण करणे आणि संग्रहालय परिसरात उपहारगृह, विश्राम गृह, तिकीट बुथ, स्वच्छतागृह, वाहन पार्किंग, संरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे. टप्पा क्र. 3 मध्ये संग्रहालयाच्या इमारतीला आतून आणि बाहेरुन रंगकाम करणे, फरशी बसवणे, दरवाजे खिडक्या बसवणे. तळमजल्यात दोन गेस्ट रुम, रेकॉर्ड रुमचे काम करणे. इमारतीस फायर स्टेयरकेस बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये निधीची गरज आहे. इस्टीमेट झाले असून सदर प्रस्ताव बांधकाम विभागाने तातडीने पुरातत्व विभागाकडे पाठवावा. निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण पाठपुरावा करु. बांधकाम विभागाला सुचीत केल्याप्रमाणे त्यांचे काम लवकरच सुरु होईल. त्यामुळे पुरातत्व विभागानेही त्यांच्या अखत्यारीतील काम तातडीने सुरु करावे. बांधकाम आणि पुरातत्व विभागाने दिरंगाई करु नये तसेच राज्य शासनानेही तातडीने उर्वरीत निधी उपलब्ध करुन द्यावा, अन्यथा मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे, उपअभियंता आर. टी. अहिरे, मोहसीन मोदी, शाखा अभियंता रवी आंबेकर, दिग्विजय वंजारी, शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक सुर्वे यांच्यासह संग्रहालयाचे काम करणारे ठेकेदारही उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






