पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019
पंढरपूर -( प्रतिनिधी ) येथील प्रसिद्ध छायाचित्रकार सचिन कुलकर्णी यांना आज बी. बी. एन. उद्योजक संस्थेने आयोजित केलेल्या ‘घे भरारी’ या उद्योजकता मेळाव्यात ‘उद्योजकता पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. पंढरपूरचे माजी आमदार व एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री सुधाकरपंत परिचारक , भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात, तसेच बी.बी.एन. पंढरपूर चॅप्टरचे कॉर्डिनेटर विश्वास आराध्ये यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी उद्योग व्यवसायात उतरावे, आणि उत्तुंग यश मिळवावे या हेतूने पुणे येथून ब्राह्मण बिझनेस नेटवर्क अर्थात बी. बी. एन. ही संस्था कार्यरत आहे. समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे, आवश्यक प्रशिक्षण देणे, इतर व्यावसायिकांशी ओळख करून देणे, जाहिरात कौशल्य देणे व इतर अनेक व्यवसाय उपयोगी उपक्रम या संस्थेच्या अंतर्गत आयोजित करण्यात येतात .या संस्थेची पंढरपूर येथे शाखा कार्यान्वित आहे. पंढरपूर शाखेच्या वतीने मागील तीन वर्षापासून, व्यावसायिकांना आपल्या उद्योगाचे ,उत्पादनाचे व व्यवसायाचे मार्केटिंग करता यावे या उद्देशाने ‘घे भरारी’ या उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही दिनांक 12 व 13 जानेवारी 2019 या दोन दिवशी टिळक स्मारक सभागृह पंढरपूर येथे घे भरारी या उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आज दिनांक 12 रोजी माजी आमदार माननीय श्री सुधाकरपंत परिचारक व भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी, ज्या व्यवसायिकांना कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना, त्यांनी कष्टातून व्यवसाय उभा केला, आणि यश संपादित केले, अशा व्यावसायिकांना या मेळाव्यात उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंढरपूर येथील प्रसिद्ध छायाचित्रकार सचिन कुलकर्णी यांनी कायम असलेली नोकरी झुगारून व्यवसायाची कास धरत अल्पावधीतच छायाचित्रण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे या गोष्टीची दखल घेत ‘घे भरारी’ उद्योग मेळावा उद्घाटन समारंभ प्रसंगी त्यांना ‘उद्योजकता पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाचे पाहुणे माजी आमदार श्री सुधाकरपंत परिचारक भागवताचार्य वा ना उत्पात व बी.बी.एन. पंढरपूर चॅप्टरचे कॉर्डिनेटर श्री विश्वास आराध्ये या मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरपूर छायाचित्रण क्षेत्रातील विविध संस्था, छायाचित्रकार, पत्रकार व सर्व थरातून कुलकर्णी यांचे अभिनंदन होत आहे
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






