👁 5 Views

‘नवा गोफण’ ची लेखणी अखेर थांबली… जेष्ठ पत्रकार, मुद्रक किशोर उत्पात काळाच्या पडद्याआड

पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019



‘सा.नवा गोफण’ चे संस्थापक संपादक किशोर उत्पात (वय-71), रा. गांधी रोड, पंढरपूर यांचे आज दि. शनिवार दि. 12 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता दु:खद निधन झाले. गेल्या कांही दिवसापासून ते आजारी होते. येथील अपेक्स हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज मृत्युशी त्यांची झुंज संपली आणि त्यांच्या जाण्याने ‘नवा गोफण’ ची लेखणी सुध्दा आज अखेर थांबली.

त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशान भुमीत 

 अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंढरपूरमधील मुद्रक, पत्रकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच उत्पात समाजातील बांधवांनी किशोर उत्पात यांना अखेरचा निरोप दिला.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार संरक्षण समितीचे पंढरपूर अध्यक्ष व न्युज 18 लोकमत चे पत्रकार विरेंद्र उत्पात यांचे ते वडील होत. 

पंढरपूर येथील सर्वप्रथम अद्ययावत आधुनिक प्रिंटींग मशिनरी युक्त अशा इंदिरा प्रिटींग प्रेस चे ते मालक होत. पंढरीत कांही वर्षापुर्वी जेंव्हा वर्तमानपत्रे, साप्ताहिके यांची छपाई एक तर जुन्या खिळ्यांनी अक्षरे जोडणार्‍या जुन्या छपाई मशिनरीजमध्ये करावी लागत असे किंवा मग सोलापूरला जावे लागत असे. त्याकाळात किशोर उत्पात यांनी एक धाडशी निर्णय घेतला. तो म्हणजे नवीन मोठ्या साईजची छपाई करणारे ऑफसेट मशिनस्नी युक्त असे इंदिरा प्रिंटींग प्रेस सुरु करण्याचा. प्रिंटींग च्या क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच चांगले नांव कमावले होते. पंढरपूरसह माळशिरस, सांगोला, अकलुज, माढा आदी इतर तालुक्यासह जिल्हाभरातून छपाईची कोणतीही कामे असो ती इंदिरा प्रिंटींग प्रेस मध्येच व्हायची. इंदिरा प्रिंटींग प्रेस सुरु झाल्यानंतर पंढरपूर सह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून अनेक नवनवे साप्ताहिकं व दैनिकं निघाली. कारण अंकाची सुबक व तात्काळ छपाई करुन देण्याचं काम आता सोपं बनवण्याचं मोलाच कार्य किशोर उत्पात यांनी केलं होतं.

आज त्यांच्या जाण्याने प्रिंटींग क्षेत्रासोबतच पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र व पंढरपूर लाईव्ह परिवाराच्या वतीने त्यांच्या चिरंतन पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपुर्ण श्रध्दांजली. त्यांना चिरशांती लाभावी हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना.















  
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *