👁 10 Views

केंद्र सरकारकडून स्वेरीला साठ लाखांचा संशोधन निधी मंजूर

पंढरपूर LIVE 16 जानेवारी 2019


स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार.

पंढरपूर- दिल्ली येथील केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी’ च्या ‘फंड फॉर इंप्रुव्हमेंट ऑफ  सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी (फिस्ट )’इन्फ्रास्ट्रक्चर योजना अंतर्गत स्वेरीला ६० लाख रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
        

  येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर अंतर्गत असलेली रिसर्च अॅण्ड  डेव्हलपमेंट अर्थात संशोधन विभाग अंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या प्रयोगशाळेच्या  अत्याधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडे दि. १४ जून २०१८ रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला तेथील समितीने अभ्यास करून हिरवा कंदील दाखविला असून साठ लाख रुपये निधी मंजुरीचे पत्र ‘फिस्ट ग्रुप’चे प्रमुख व शास्त्रज्ञ डॉ. ए मुखोपाद्याय यांच्या स्वाक्षरीसह मिळाले आहे.डी.एस.टीया नामवंत संस्थेच्या ‘फिस्ट प्रोग्रॅम’ या योजने अंतर्गत मिळालेला निधी हा पाच वर्ष कालावधीसाठी असणार आहे. 

दि. ३० आक्टोंबर २०१८ मध्ये झालेल्या कोचीनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाचे सादरीकरण स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी केले होते. हा संशोधन निधी मिळाल्यामुळे भविष्यात अत्याधुनिक मशिन्स निर्माण होवून विकासाला गती मिळणे शक्य होणार आहे. अत्याधुनिकीकरण नंतर याचा उपयोग सिव्हील इंजिनिअरींग विभागात लोड फ्रेम इक्यूपमेंट, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अॅडव्हान्सड मॅन्युफॅक्चरिंग सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरींग आणि कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागात एन.आय. सॉफ्टवेअर अॅण्ड हार्डवेअर सिस्टम म्हणून उपयोग केला जाणार आहे.


 ‘फिस्ट’ योजने अंतर्गत निधी मिळविणारे महाराष्ट्रातील खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून हे दुसरे महाविद्यालय आहे तर मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत येणाऱ्या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून हे पहिलेच महाविद्यालय आहे. ‘स्वेरी’मध्ये संशोधन विभागाची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत जवळपास ५. ७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून आता यामध्ये या ६० लाख रुपये निधीची भर पडली असल्यामुळे एकूण निधी जवळपास ६. ४५ कोटी रुपये इतका झाला असून स्वेरीमध्ये संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. साठ लाखांचा निधी मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल शिंदे यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्यासह इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *