पंढरपूर LIVE 24 जानेवारी 2019
पंढरपूर /लातूर , दि.२३: भारतीय संस्कृतीत गौमातेचे असलेले अनन्यसाधारण असे
महत्व ओळखून लातूर येथील भारतीय गोवंश संवर्धन संस्था व निळकंठेश्वर गौशाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५१ दिवसीय लातूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर गौ दिंडी महोत्सवाच्या ह्या गौ दिंडीच्या पंढरपुरातील आगमनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २५ जानेवारी २०१९ रोजी पंढरपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या गौ दिंडीचे मुख्य संयोजक सीए मयूर मंत्री यांनी दिली.

रविवार, दि. २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर, (इस्कॉन ) पंढरपूर येथील शिल प्रभुपाद घाट याठिकाणी गो-पुष्टी महायज्ञ होईल. हा विधी
वेद मुर्ती अतुल चंद्रकांत कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते संपन्न होईल. यावेळी प. पु. आचार्य लोकनाथ स्वामी महाराज, पदयात्रा मंत्री, इस्कॉन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या गो पुष्टी यज्ञाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे मयूर मंत्री यांनी सांगितले.
या गो दिंडीच्या यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक सीए मयूर मंत्री, हभप. निळकंठ महाराज डावकरे यांच्याबरोबरच समन्वयक जुगल बाहेती, सुनील राठी, रवींद्र साळे, बाबासाहेब बडवे ,उमेश वाघोलीकर, हरीष ताठे यांसह अनेक मान्यवर परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर या गो दिंडीला श्री केशव गोशाळा, श्री पांडुरंग गोशाळा, श्री बालयोगी गोशाळा, श्री श्री विठ्ठल रुक्मिणी गोशाळा, श्री राधा पंढरीनाथ गोशाळा, श्री गोरक्षण गोशाळा , श्री कापड व्यापारी संघ,, श्री माहेश्वरी सभा, पंढरपूर,श्री माहेश्वरी युवा संगठन, श्री माहेश्वरी महिला मंडळ, श्री राजस्थानी मंडळ, पंढरपूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू सभा, पश्चिमद्वार व्यापारी संघटना,शिवप्रतिष्ठान पंढरपूर, लिंगायत प्रतिष्ठान , विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्था, वारकरी पाईक संघ, वीर बाजी प्रभू प्रतिष्ठान, सनातन संस्था, हिंदू जनजगृती संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, श्री शिवभक्त प्रतिष्ठान ,मुमुसु पाठशाळा, जोगदंड वारकरी शिक्षण संस्था, पेशवा युवा मंच, ब्राह्मण संघटन ,कोळी महर्षी वाल्मिकी संघटन , शिवप्रेमी संगठन, इस्कॉन पंढरपूर व गोशाळा, गोप्रेमी या सर्वांचे सहकार्य लाभत असल्याचे मयूर मंत्री यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





