👁 9 Views

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पंढरपूर LIVE 26 जानेवारी 2019

देशाच्या विकासात युवकांचे स्थान महत्वाचे

अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान

पंढरपूरः- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सायली कोळी यांनी ‘ए वतन, मेरे वतन, आबाद रहे तुमे …’ या सुरेख चालीच्या गीतातून देशावरील प्रेम सादर केले तर पल्लवी काळे व आदर्श वेर्णेकर या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक म्हणजे नेमके कायहे सांगून भारतातील वाढत्या समस्या, अन्याय, अत्याचार, बेरोजगारी, गरिबी, शेतकऱ्याच्या आत्महत्या, उच्च शिक्षण, भ्रष्टाचार या गंभीर समस्यांवर देखील प्रकाश टाकला. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान म्हणाले की, ‘भारत हा युवकांच्या प्रयत्नांवर, संघर्षावर यश मिळवत असून क्रीडा, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा क्षेत्रात आजचा युवक प्रचंड परिश्रम घेत असून युवकांच्या शक्तीवर भारत महासत्तेकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात युवकांचे स्थान महत्वाचे आहे. 

एकूणच राष्ट्रशक्ती ही आजच्या युवकांवर अवलंबून आहे. यासाठी युवावर्ग सतर्क असणे गरजेचे आहे.’ यावेळी चारही महाविद्यालयातील सर्व विभागाचे स्वतंत्ररित्या बुलेटीनचे प्रकाशनही करण्यात आले. संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.बी.शिंदे यांनी स्वेरीयन’ या त्रैमासिकाचे अंतर्मन उलघडून दाखविले. यावेळी स्पिरीट २ के १९ या राष्ट्रीय परिषदेच्या पोष्टरचे उदघाटन देखील करण्यात आले. दिवसभर देशभक्तीपर गीतांनी कॉलेज कॅम्पस दुमदुमला. यावेळी सोलापुरातील मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे प्रमुख अमजदखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीमध्ये आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात डिप्लोमातील ५१ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. 

यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, अभाविपचे प्रदेशाध्यक्ष हंसराज जोशी, प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे, शरद गोस्वामी, गीता मार्लेगावकर, प्रा. चत्रभुज गोडबोले, निर्भय विसपुते, प्रा. गुरुसंगाप्पा वाणी या पाहुण्यांसह स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, विश्वस्त सुरज रोंगे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ,डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे,कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवाररजिस्ट्रार राजेद्र झरकरप्रा.यशपाल खेडकर,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रा. एस. डी. भिंगारेअधिष्ठाता,विभागप्रमुखप्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी, योगेश कदमविद्यार्थी सचिव अक्षयकुमार कोरे, पालक वर्ग यांच्यासह संस्थेअंतर्गत असणार्‍या अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदविकापदवी व पदवीत्तर पदवी व एम.बी.ए.चे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. सुत्रसंचालन सिमरन मुजावर व रिचा तामाणे यांनी केले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *