👁 9 Views

पंढरपूर-मोहोळ मार्गावरील अपघातील मृतांची संख्या 6 …सर्व मयतांचे मुळ गांव आणि मयतांच्या नावासह डिटेल्स माहिती

पंढरपूर LIVE 2 फेब्रुवारी 2019          

               

पंढरपूर-मोहोळ मार्गावर घाडगे वस्ती, देगाव नजीक आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातातील लहान मुलाचाही मृत्यु झाला असून या अपघातामधील मृतांची संख्या 6 झाली आहे. अपघातातील गंभीर जखमी धनश्री सुरेश सावंत या मुलीवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पंढरपूरकडून सोलापूरकडे जाणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगाराच्या  इस्लामपूर- अक्कलकोट या एस.टी. MH- 07- C- 9017 ला मोहोळकडून समोरून येणारी इको मारुती MH-03- AZ-3116 ही गाडी जोरात धडकली.  

या अपघातामध्ये मयत झालेल्यांची नांवे खालीलप्रमाणे आहेत.
1. सुरेश रामचंद्र कोकणे वय-55 (कारचालक)
2. सचिन सुरेश कोकणे वय -३५
3. सविता सचिन कोकणे वय- ३०
4. आर्यन सचिन कोकणे- वय-१०
5. श्रद्धा राजेंद्र सावंत वय- ३०
6. प्रथम राजेंद्र सावंत वय- १५
सर्व रा. घाटकोपर मुंबई, मुळ राहणार घोडेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे.
पंढरपूरला देवदर्शनासाठी आलेल्या घाटकोपर-मुंबई येथील या भाविकांवर आज काळाने घाला घातला. ही दुर्दैवी घटना मात्र एकच शिकवण देवून जाते…. प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळायलाच हवेत. अन्यथा क्षणात होत्याचे नव्हते होते.
        
या भीषण अपघातात एसटीच्या खाली गेलेली इको गाडी
अपघाताची भीषणता
सर्व मृत गाडीतच अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अर्धा ते पाऊण तास प्रयत्न करावे लागले. दोन वाहने दोन्ही बाजूला लावून इको गाडीचे दरवाजे काढावे लागले आणि त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अपघाताच्या ठिकाणी रक्त, कपडे, वापरातील विविध वस्तू, वाहनांच्या काचा याचा खच पडला होता.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *