पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019
पंढरपूर, दि. 06 :- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव सोमवार दिनांक 11 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथेआयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
मोहोळ तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठे व वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे 158 ब्रास वाळू जप्त केली असून, हा वाळू साठा मौजे पिरटाकळी येथे 25 ब्रास, मौजे देगांव (वा.) येथे 02 ब्रास, मौजे खुरकटणे, मारुती मंदीराजवळ 16 ब्रास तसेच शासकीय धान्य गोदाम, मोहोळ येथे 115 ब्रास वाळू साठा ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे 11 लाख 6 हजार रुपये इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी दिनांक 08 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत असेहीउपविभागीय अधिकारी ढोले यांनी सांगितले.
सदर लिलावात भाग घेण्यासाठी 25 टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे भरणे आवश्यक आहे. सर्वोत्तम बोलीची 25 टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात 7 दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






