👁 10 Views

कौशल्यावर आधारित शिक्षण ही काळाची गरज – मंत्री ना. सुभाष देशमुख

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019

पंढरपूर: ‘आधुनिक काळात होणाऱ्या बदलाला सामोरे जाण्यासाठी प्राध्यापक व प्राचार्यांनी गुणवत्ता निरंतर वाढविली पाहिजे. नाविन्यपूर्णता, प्रयोगशीलता यांचा अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत उपयोग करून शिक्षणाला समाजकेंद्रित आणि विद्यार्थीकेंद्रित करावे. कौशल्यावर आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. या शिक्षणामुळे पदवीधारकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी ज्ञानक्षेत्रातील प्रत्येकाला तोलामोलाची गुणवत्ता प्राप्त करावी लागेल.’ असे विचार महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या ३८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या समारंभाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, ‘ महविद्यालये ज्ञानकेंद्रे आहेत आणि विद्यापीठ त्यांचे मुख्य केंद्र आहे. आपण सर्वांनी भविष्यातील बदलाचा स्वीकार करण्याच्या विडा उचलला आहे. आपण पारंपरिक शिक्षणाला कौशल्य शिक्षणाची जोड दिली पाहिजे. आजचा विद्यार्थी तंत्रज्ञान अवगत असणारा आहे, म्हणून आपले ज्ञान अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. प्राचार्य हे प्रशासक नसून अनेक बाबींचा त्यांना विचार करावा लागतो.’ या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. नंदकुमार निकम यांनी अधिवेशनातील ठरावांचे वाचन केले.         

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अशोक भोईटे , डॉ. आबासाहेब देशमुख, डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. एस. टी. गडदे, डॉ. डी. बी. जाधव, डॉ. दिलीप गोतमारे, डॉ. क्रांतीकुमार पाटील, डॉ. बी. यु. जाधव, डॉ. आर. एम. सदन, डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. आर. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी केले. डॉ. चंद्रकांत कोळेकर, डॉ. राजेंद्र शेंडगे, डॉ. भीमाशंकर भांजे, डॉ. साहेबराव जुंधळे, डॉ. जे.जी. जाधव, डॉ. डी. जी. साळुंखे तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आभार डॉ. आबासाहेब देशमुख यांनी मानले. समारोप समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *