👁 10 Views

स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांना जी.पी.ए.टी. परिक्षेत यश !

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019

पंढरपूरःगोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्मसी) महाविद्यालयातील राहुल जाधव, सुजाता वाघमोडे, कुशल वांगदले व पूनम पोपेरे या चार विद्यार्थ्यांना जी.पी.ए.टी. (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०१९ या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे.

         
 येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित औषधनिर्माणशास्त्र तथा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे राहुल नवनाथ जाधव, सुजाता शहाजी वाघमोडे, कुशल विठ्ठल वांगदले व तिसऱ्या वर्षी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूनम पोपट पोपेरे हे एम. फार्मसी शिक्षण घेण्यासाठी ए.आय.सी.टी.ई. अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील अतिशय अवघड परंतु आवश्यक असणाऱ्या जी.पी.ए.टी. परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशा दर्शक मार्गदर्शनाखाली, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी.सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि जानेवारी २०१९ रोजी झालेल्या जी.पी.ए.टी. परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. 

२००६ साली स्थापन झालेल्या बी. फार्मसीमध्ये प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या उज्वल यशाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. सन २०१० साली संतोष गेजगे या विद्यार्थ्याने याच जी.पी.ए.टी. परीक्षेत भारतात ११७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशाचा पाया खणला होता. तेथून पुढे प्रत्येक वर्षी स्वेरीच्या बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना जीपॅटमध्ये भरघोस यश मिळत आहे आणि हीच परंपरा यंदा देखील कायम राखली असल्याचे दिसून येते. यशस्वी विद्यार्थी मात्र यशाचे श्रेय आई-वडीलशिक्षकवृंदाबरोबरच ‘पंढरपूर पॅटर्न’ व रात्र अभ्यासिकेला देखील देतात. मिळालेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे हे मात्र निश्चित. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, प्राचार्य डॉ. एस.डी.सोनवणे, उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *