प्रेमचंद उर्फ पुनमचंद जीत मुसहर (वय 29, रा. व्हीटी लेबर कॅम्प, म्हाळुंगे) असे जखमी मजुराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार छोटू प्रसाद, भोला प्रसाद (रा. व्हीटी लेबर कॅम्प, म्हाळुंगे, ता. मुळशी. मूळ रा. उत्तर प्रदेश) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराच्या बाहेर थांबले असताना आरोपींनी विनाकारण फिर्यादींना शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता छोटू याने फिर्यादी कानशिलात लगावली.
त्यानंतर लोखंडी हातोडा फिर्यादी यांच्या डोक्यात मारला. भोला याने लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्यात 11 टाके पडले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहे.



