👁 6 Views

विठुनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने दुमदुमली पंढरी नगरी.

पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019


जया एकादशी माघ वारीच्या सोहळ्यानिमित्त श्रीविठ्ठल -रुक्मिणीच्या दर्शनसाठी लाखो वारकरी भाविक भुवैकुंठ पंढरी नगरीत दाखल झाले होते. विठुनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात अवघी पंढरी नगरी आणि चंद्रभागा तीर दुमदुमून गेला होता. कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु। तेणे मज लावियेला वेडु॥ या अभंगामध्ये वर्णन केल्याप्रमाणे कर्नाटकमधील अनेक विठ्ठलभक्त या वारीला येत असतात. दुष्काळी परिस्थिती असतानाही या वारीला लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक आल्याचे आढळून आले.

Video News


जया एकादशी सोहळ्यानिमित्त विठ्ठलाची नित्यपुजा कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या शुभहस्ते सपत्नीक पार पडली. दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने 24 तास स्वच्छ व थंड पाणी देण्यात येत होते.  तसेच एकादशीनिमित्त  चहा, खिचडी  देण्यात आली. 
 दर्शनरांगेतील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची पुर्ण दक्षता घेतली असून पददर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी 8 ते 9 तास लागत होते.  मुखदर्शनाची रांग लांब गेल्याने मुखदर्शन घेण्यासाठी तब्बल दोन तास लागत होते. शहरातील मठ, लॉज , धर्मशाळा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. अबीर बुक्का कपाळी लावुन, विठोबाच्या चरणावर नतमस्तक होत आपल्या सर्व दु:खाचा भार देवावर सोपवणारे वारकरी भाविक सावळ्या विठ्ठलाला डोळे भरुन पाहुन प्रसन्न मनाने व भक्तीमय अंत:करणाने आपली माघी वारी पुर्ण झाल्याने समाधानी झाले होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *